मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नागरिक बसने वाहतूक करतात. आता वाहतूकीचा खर्च आणखी वाढणार असून सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरांत येत्या काही दिवसांत आणखी वाढ होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहेत. एसी बसचेही तिकीट दर वाढणार आहेत. एसी बससाठी 10 किमीमागे 3 रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत आता बसच्या तिकीट दरवाढीची भर पडणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिलेत. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याासाठी हे निर्देश देण्यात आलेत. दिवसाला तब्बल 35 लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. त्यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग
तिकीटाचे दर वाढणार असल्याने आदित्य ठाकरेंनी यावर ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. "येथील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बेस्टच्या बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. भाजप हे मुंबईविरोधी असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आणि ही प्रस्तावित भाडेवाढ हा मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे."
"प्रथमत: बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. बस थांब्यांचे रूपांतर कंत्राटदारांच्या जाहिरात फलकांमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे भाडेवाढ का?", असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्वीटमधून विचारला आहे.
"आम्ही भाडे जगातील सर्वात परवडणारे असावे म्हणून ठेवले होते आणि तरीही आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बसेसचा ताफा वाढवत आहोत. मुंबईविरोधी असलेल्या भाजपच्या राजवटीत भाडे वाढवून बसेस कमी करून मुंबईकरांचे हाल होत आहेत." अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.