Mumbai Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: मुंबईत भरधाव बेस्ट बसची कारला धडक, चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू; भयंकर VIDEO

Mumbai Police: मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने उभ्या कारला धडक दिली. या अपघातामध्ये बस आणि कारमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Priya More

गणेश कवाडे, मुंबई

मुंबईमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बेस्ट बसने कारला जोरदार धडक दिली. यावेळी बस आणि कारच्या मध्ये चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर हा अपघात झाला. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. या अपघातामुळे घटनास्थळावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर ९ वाजताच्या सुमारास अपघात झाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्यावरून जाणारी एक पादचारी महिला बस आणि कारच्या मधोमध चिरडली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. ही महिला कोण होती याची माहिती अद्याप समोर आली नाही.

पोलिसांनी सांगितले की, या अपघातामध्ये मृत्यू झालेली महिला दक्षिण मुंबईतील राहणारी होती. नीता शाह असं या महिलेचे नाव होते. ती मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. यावेळी मॉर्निंग वॉक करत असताना अचानक बसने कारला धडक दिली. या दोघांच्या मध्ये ही महिला आली. बसच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला. या महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. सदर महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

'The Bads Of Bollywood' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी, जान्हवी कपूरसोबत झळकणार?

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Nagpur : फूड डिल्हिव्हरी एजंटला विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये नो एंट्री | VIDEO

SCROLL FOR NEXT