New Vande Bharat Sleeper Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Sleeper : स्लीपर वंदे भारत मुंबईतून 'याच' महिन्यात धावणार, ८ तास वाचणार; जाणून घ्या वेळ आणि तिकीट दर

Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper Train: मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ सुमारे १६ तासांवर येऊ शकतो. संभाव्य थांबे, वेळापत्रक, तिकीट दर आणि उद्घाटनाच्या तारखेबाबतची माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper launch date : महाराष्ट्रातून धावणाऱ्या पहिल्या 'स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस'ची राज्यातील प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन राज्यांना जोडणारी ही अतिवेगवान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते बंगळुरू (Bengaluru-Mumbai CSMT Vande Bharat Sleeper) या मार्गावर धावणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अत्यंत वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला होता. त्यानंतर या मार्गावर घेण्यात आलेल्या सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून या संदर्भातील अंतिम आराखडा तयार केला जात असून, लवकरच या ट्रेनच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा केली जाईल. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावेल. मुंबईहून निघाल्यानंतर ही ट्रेन महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. यामुळे पुणे आणि सोलापूर या दोन प्रमुख शहरांतील प्रवाशांचा प्रवास वेळ वाचणार असून, त्यांना या ट्रेनचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

मुंबई-बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार? When is Bengaluru-Mumbai Vande Bharat Sleeper launching?

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पुढील काही दिवसांत याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. रेल्वे झोन्सला लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. एक्सप्रेस कधी सुरू करायची? त्याच्या लाँचिंगची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहिती ही ट्रेन याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

स्लीपर एक्सप्रेसमुळे किती वेळ वाचणार? How Much Time Will It Save?

मुंबई आणि बंगळुरू या दोन शहरांना जोडणारी सध्या उद्यान एक्सप्रेस (Udyan Express) ही एकमेव ट्रेन आहे. या ट्रेनला मुंबई-बंगळुरू हे अंतर कापण्यासाठी २४ तास लागतात. पण स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस हेच अंतर फक्त १६ तासांत पूर्ण करेल, असा अंदाज आहे. म्हणजेच, वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केल्यास दोन्ही Bengaluru and Mumbai या शहरातील अंतर ८ तासांनी कमी होणार आहे.

आठवड्यातून किती दिवस धावणार? How Many Days A Week Will It Run?

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल. बंगळुरूतून एक्सप्रेस सोमवार वगळता इतर ६ दिवस नियमीत धावेल. तर मुंबईतून ही ट्रेन मंगळवारी सुटणार नाही. या एक्स्प्रेसचे अद्याप अधिकृत वेळापत्रक जारी करण्यात आले नाही. रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातून धावणाऱ्या पहिल्या स्लीपर वंदे भारतचे वेळापत्रक आणि थांबे जारी केले जातील.

स्लीपर वंदे भारत मुंबईतून कधी सुटणार अन् बंगळुरूला कधी पोहोचणार? What Are The Departure And Arrival Timings?

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतून दररोज रात्री (मंगळवार वगळता) १.०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.५० वाजता बंगळुरूला पोहोचेल. तर बंगळुरूमधील ही ट्रेन दररोज रात्री (सोमवार वगळता) १० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता मुंबईत पोहोचल. दोन्ही दिशांच्या प्रवासात तुम्हाला रात्रभर झोपण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो.

कोणत्या स्थानकावर स्लीपर वंदे भारत थांबणार? What Are The Stops?

बंगळुरू-मुंबई ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस हुबळीमधून जाणार नाही. अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर आणि कल्याण हे संभाव्य थांबे असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक, तेलंगणा सीमा प्रदेश आणि महाराष्ट्र या ३ राज्यातून ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट किती? Mumbai-Bengaluru Sleeper Vande Bharat Express ticket fares

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसच्या अधिकृत आणि अंतिम तिकीट दरांची घोषणा अद्याप भारतीय रेल्वेने केलेली नाही. पण रेल्वेच्या प्रस्तावित अहवालानुसार आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार थर्ड एसी (3AC) अंदाजे ₹२,४०० ते ₹३,०००, सेकंड एसी (2AC) अंदाजे ₹३,१०० ते ३,५०० च्या दरम्यान आणि फर्स्ट एसी (1AC): अंदाजे ₹३,८०० किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते.

अनेक दिवसांची मागणी People Have Been Waiting Long For This

बंगळूरु-मुंबई या मार्गावरील रेल्वेला अधिक वेगवान बनवण्याची मागणी प्रवासी गेल्या ३० वर्षांपासून करत आहेत. सध्या या दोन शहरांना जोडणाऱ्या केवळ दोन थेट ट्रेन आहेत. त्यापैकी उद्यान एक्सप्रेस ही एकमेव दररोज धावणारी गाडी आहे. वंदे भारत स्लीपर ही अनेक दशकांनंतर या मार्गावरील झालेली पहिली मोठी एक्सप्रेस आहे.

मडगाव-मंगळूरू वंदे भारत एक्सप्रेसचा आता बंगळुरूपर्यंत विस्तार Madgaon-Mangaluru Vande Bharat Express

मडगाव ते मंगळूरू धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग आता वाढवण्यात आला असून, ती हसन, उडुपी आणि कारवारमार्गे थेट बंगळुरूपर्यंत धावणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी 'यशवंतपूर-मंगळूरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस' या नावाने धावेल.

या विस्तारामुळे बंगळुरू आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागातून थेट गोव्यापर्यंत एक अत्यंत वेगवान आणि सोयीस्कर असा 'वंदे भारत' रेल्वे दुवा (कनेक्टिव्हिटी) निर्माण झाला आहे. यामुळे कोकण आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSR News : १७ राज्यात SSR, पण महाराष्ट्राला वगळलं, नेमकं कारण काय?

Tesla Roadster : टेस्लाची नवी भरारी! बहुप्रतिक्षित 'रोडस्टर' इलेक्ट्रिक कार अखेर लाँच, एका सेकंदात 97किमी अंतर करणार पार

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Four eggs a day: दिवसाला 4 अंडी खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं कोलेस्ट्रॉलवर कसा होतो परिणाम

Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT