Bandra Fort sparks controversy after permission for liquor party; Thackeray Sena protests strongly. saam tv
मुंबई/पुणे

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bandra Fort Liquor Party Row : गड, किल्ल्याचं संवर्धन, संरक्षण करण्यात यंत्रणा कमी पडत असतानाच आता किल्ल्यावर सरकारी परवानगीने चक्क दारुपार्टी झाल्याचा दावा करण्यात आलाय.. तर याच किल्ल्यावरच्या दारुपार्टीवरुन ठाकरे सेनेनं सत्ताधा-यांवर हल्लाबोल केलाय. नेमका कुठे झालाय हा धक्कादायक प्रकार? मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ? पाहूया या रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्हाला वाटेल ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा लॉनमध्ये मस्त पार्टी रंगली आहे. हातात बिअरचे कॅन, दारुचे ग्लास घेऊन बड्या धेंड्यांचा धिंगाणा सुरु आहे. मात्र थोडं थांबा हे कुठलं हॉटेल नाही तर चक्क किल्ला आहे आणि तोही मुंबईतील. राज्यातील गड-किल्लांची दुरवस्ता होत असतानाच आता चक्क किल्ल्यावर दारुपार्ट्या होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. विशेष म्हणजे सरकारी परवानगीने पार्टी केली जात असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा आरोप ठाकरेसेनेने केलाय. अखिल चित्रेंनी दारू पार्टीचा व्हिडीओ ट्विट केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेने ऐतिहासिक किल्ल्यावर दारू पार्टीला परवानगी कशी दिली ?असा सवाल त्यांनी केला आहे. या कार्यक्रमाचं संयोजन स्वतः महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

या गंभीर प्रकारावरुन काँग्रेसनेही हल्लाबोल केलाय. दारु पार्टीला लाच घेऊन परवानगी दिली, असा घणाघाती आरोप आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्यास कारवाई होणार, अशा इशारा दिलाय. पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणारी ही मुंबईतील ऐतिहासिक वास्तू आहे. १६४० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला.

किल्ला मुख्यत्वे माहीम खाडी आणि अरबी समुद्रावर टेहळणी करण्यासाठी आणि संरक्षणासाठी बांधला गेला होता. १८व्या शतकात ब्रिटिशांनी या किल्ल्याचा काही भाग नष्ट केला. आज हा किल्ला एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक इथे येतात. राज ठाकरेंनीही गड, किल्ल्यांची जपणूक करण्यात सरकार कमी पडत असल्याचा निशाणा साधला होता. असं असताना वांद्रे किल्ल्यावरची व्हाईट कॉलर धनदांडग्यांची खूलेआम पार्टी ऐतिहासीक खूणांचं महत्व किती कमी होत चाललंय आणि सरकारी यंत्रणा किती उदासिन आहे. हेच अधोरेखीत करतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sofia Ansari: सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन पूर्ण, बोल्ड फोटोंनी केलं सेलिब्रेशन

Maharashtra Live News Update: मनसेकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी

Mumbai Local Mega block : मुंबईत मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल; कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

मंत्री येत नसतील तर बिबटे सोडा, मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात संताप|VIDEO

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

SCROLL FOR NEXT