Anti Narcotics Cell Saam Tv
मुंबई/पुणे

Anti Narcotics Cell: राजस्थानातून आणलेले 3 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त, एकाला अटक

मुंबईच्या आझाद मैदान अंमली पदार्थ युनिटने तब्बल 3 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे.

सुरज सावंत

मुंबई : मुंबईच्या आझाद मैदान अंमली पदार्थ युनिटने तब्बल 3 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. राजस्थानच्या प्रतापगड परिसरातून हे ड्रग्ज आणण्यात आलं होतं अशी माहिती आहे. या प्रकरणी अमनउल्ला खान या 65 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे (Mumbai Azad Maidan Unit Of Anti Narcotics Cell Arrested Drug Peddler With 3 Crore Heroin).

पोलिसांनी त्याच्याकडून 1 किलो हेरॉईन (Heroin) जप्त केले असून बाजारात त्याची किंमत 3 कोटी इतकी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आझाद मैदानाचे अंमली पदार्थ युनिट अधिक तपास करत असून या मागे असलेल्या मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

मुंबई (Mumbai) शहरात हेरॉईन या अंमली पदार्थाचा तस्करी राजस्थानमधील चित्तोडगड येथील तस्कर रेल्वेमार्गे तसेच बसमार्गे होत असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी कक्षाला प्राप्त झाली होती. मुंबईत हेरॉईनचा सप्लाय करणारे अशा तस्करांचा माग मागील काही दिवसांपासून काढण्यात येत होता. तसेच, त्याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया सुध्दा करण्यात आलेल्या आहेत.

आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांना मुंबई परिसरात 'हेरॉईन' या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येत असल्याची खबर मिळाली. त्याप्रमाणे बोरीवली पूर्व, मुंबई परीसरात आझाद मैदान युनिटचे पोलीस पथकाने सापळा लावुन राजस्थानचा रहिवाशी असणारा प्यारे अमनउल्ला खान याच्याकडून 1 किलोग्रॅम 'हेरॉईन' जप्त केली. ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रूपये एवढी आहे.

आरोपीविरोधात कलम 8 (क) सह 21 (क) एन्. डी. पी. एस्. अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात अंमली पदार्थांचे तस्करीत सहभागी असणारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT