

अंतिम टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने मालिका ४-१ ने खिशात घातली.
तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर भारताचा दमदार विजय झालाय.
अर्शदीप सिंगची ५ विकेट घेतल्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम झाला. येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेलेल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला.
भारतीय संघाने ४६ धावांनी अखेरचा पाचवा सामना जिंकलाय. या सामन्यात आधी किवीच्या गोलंदाजांची इशान किशनने धुलाई केली, त्यानंतर किवीच्या फलंदाज भारतीय गोलंदाजांचा भेदक माऱ्यापुढे चीत झाले. आधी दोन षटकात सपाटून मार खाल्यानंतर अर्शदीप सिंग आपल्या भेदक माऱ्यानं न्युझीलंडच्या खेळाडूंना नाकीनऊ आणलंय. एका नंतर एक विकेट घेत अर्शदीप सिंगनं ५ खेळांडून तंबूचा रस्ता दाखवला.
या विजयासह भारताने टी२० पाच सामन्यांची ही मालिका ४-१ अशी जिंकलीय. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशनचे शतक आणि सूर्याच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकांत २२५ धावांवर गारद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने पाच विकेट घेतल्या. या विजयासह भारताने टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली.
भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. फिन ऍलनने ३८ चेंडूत ८० धावा केल्या. रचिन रवींद्रनेही १७ चेंडूत ३० धावा जोडल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अर्शदीप सिंगने पाच, अक्षर पटेलने तीन आणि वरुण चक्रवर्तीने एक बळी घेतला. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकांत २२५ धावांवर गारद झाला
भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली पण ते ४२ धावांवर दोघेही बाद झाले. त्यानंतर इशान किशनने जोरदार फलंदाजी केली आणि आपले शतक पूर्ण केले, त्याने फक्त ४३ चेंडूत १०३ धावा केल्या, आत ६ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवनेही कर्णधाराची खेळी खेळली, त्याने ३० चेंडूत ६३ धावा केल्या. हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान, न्यूझीलंडचे गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.