मुंबईतील कंपनी मॅनेजरकडून महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार आणि ब्लॅकमेलचा प्रकार उघड
आरोपी प्रदीप नरळे याने पत्नी आणि भावाच्या मदतीने गुन्हा केला
गुंगीचे औषध देऊन बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवले आणि खंडणी उकळली
प्रकरणामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
नवी मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका कंपनीच्या मॅनेजरने कर्मचारी महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा नराधम एवढ्यावरच न थांबता त्याने कंपनीतील कर्मचारी महिलांचे अनेक अश्लील व्हिडिओ करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणीही उकळल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील एका विमा कंपनीत प्रदीप नामदेव नरळे हा ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत होता. नरळे हा विवाहित होता. त्याच्याच कंपनीतील नागपूर शाखेत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय महिला सहकाऱ्याशी त्याची ऑनलाइन मीटिंगदरम्यान ओळख झाली. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली, त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हळूहळू या दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. ही कर्मचारी महिला २७ मार्च रोजी कामानिमित्त मुंबईत आली होती.
या दरम्यान या दोघांची भेट झाली. नरळे याने कर्मचारी महिलेला पनवेल येथील आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांना जेवणाचा आग्रह केला. पाहुणचाराच्या बहाण्याने जेवण देत त्यात गुंगीचे औषध दिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली आणि संधी साधून त्याने महिलेवर बलात्कार केला. धक्कदायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ नरळेच्या बायकोने काढल्याचं उघडकीस आलं आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून नरळे याने महिलेला अनेकदा धमकावून ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले. या सगळ्यात आरोपीला त्याच्या बायकोने आणि भावाने साथ दिली आहे. दरम्यान महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली असता पनवेल शहर पोलिसांनी प्रदीप नामदेव नरळे याला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याची बायको रेणुका नरळे आणि भाऊ प्रविण नरळे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असून पुन्हा एकदा कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या तिघांना काय शिक्षा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.