Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Nandurbar News : नंदुरबारमध्ये ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. सहा दिवस रस्त्यावर पडूनही मदत न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Nandurbar NewsSaam Tv
Published On
Summary

शहादा ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला

रुग्णालयाच्या बाहेर सहा दिवस रस्त्यावर पडूनही तिला मदत मिळाली नाही

इन्कलाब फाउंडेशनने जिल्हाधिकाऱांकडे तक्रार दाखल

जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी चौकशीचे आदेश देऊन कारवाईचे आश्वासन दिले

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी नंदुरबार

नंदुरबारमध्ये संतापजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय रामभरोसे असून हॉस्पिटलमध्ये गंभीर निष्काळजीपणामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ५० वर्षांची महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. मात्र, तब्येतीत सुधारणा न झाल्याने ती रुग्णालयाच्या बाहेर आली आणि रुग्णालयापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर गेल्यानंतर सहा दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेची अवस्था अत्यंत वाईट असूनही रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला कोणतीही मदत केली नाही.

Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी तिच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले, इतकेच नव्हे तर काही डॉक्टरांनी रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या शेजारून जातानाही थांबून चौकशी केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. शेवटी त्या महिलेचा मृत्यू झाला. या निष्काळजीपणाचा मुद्दा इन्कलाब फाउंडेशनने गंभीरपणे घेतला असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांची भेट घेतली. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती देत निष्काळजी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली.

Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असून, दोषी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. या घटनेमुळे शहादा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार आणि मानवी वागणूक मिळावी, हीच सर्वांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com