Mumbai News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक प्रकार; फेरीवाल्या महिलेने पादचाऱ्यावर उगारला चाकू अन्...'; संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Street vendor woman trying to attack common man : मुंबईतील अंधेरीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका फेरीवाल्या महिलेने पादचाऱ्यावर चाकू उगारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील फेरीवाले आणि लोकांमधील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीतील एका फेरीवाल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनधिकृत फेरीवाली महिला पादचारी पथावर चालणाऱ्या व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चक्क चाकू मारायला धावते. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईत लोकांना चालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या दोन्ही बाजून पदपथ बांधले आहेत. मात्र, या पदपथावरून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा देखील शिल्लक नसल्याच्या शेकडो तक्रारी महापालिकेकडे पडून आहेत. मात्र, पालिकेचे प्रत्येक वार्डातील लायसन्स अधिकारी आणि मुकादम हे फेरिवाल्यांकडून चिरीमिरी घेऊन पदपथावरून व्यवसायाची गाडी टाकण्यास परवानगी देतात.

अनेकदा पादचारी आणि फेरीवाल्यांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरात फेरीवाल्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तसेच ठाणे महापालिकेसमोरच फेरीवाल्याकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातावर चाकू हल्ला करून त्यांची दोन बोटे देखील तुटली होती. फेरीवाल्यांची दादागिरी सर्वसामान्यांना नवीन नाही.

अनेकदा पदपथ पाहून प्रश्न पडतो की, हे पदपथ लोकांना चालण्यासाठी बनवले आहे की, फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी? कारण मुंबईतील रेल्वे स्थानक किंवा बस स्टँड असो, तिथे सर्रास फेरीवाल्यांचा वावर दिसून येतो. काही रेल्वेस्थानकांबाहेर लोकांना चालण्यासाठीही नीट जागा नसते. पण फेरीवाले आरामात रस्त्यावर व्यवसाय करताना दिसतात.

नेमकं काय घडलं?

काल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील के पूर्व प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रोस्थानका शेजारील खाऊगल्लीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी अंडी विक्री करणाऱ्या महिलेकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. त्याशिवाय महिला हातात चाकू घेऊन धावून जात असल्याचे देखील दिसून येत आहे. या महिलेला त्या ठिकाणी असलेल्या पुरुषांकडून रोखण्यात आलं. मात्र फेरीवाल्यांची ही दादागिरी वाढू लागल्यामुळे पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांना निमुटपणे त्रास सहन करून जावे लागत आहे.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानकाच्या बाजूला असलेल्या खाऊगल्लीत पादचाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि चाकू उगारण्याऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नागरिकांकडून पालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयातील लायसन्स आणि मेंटेनन्स विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT