Mumbai Andheri Police Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Mumbai Andheri Police: अंधेरीत पोलीस हवालदार मुकेश देव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आजारपण व कुटुंब दूर गेल्याच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

  • अंधेरीत पोलीस हवालदार मुकेश देव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • आजारपण व कुटुंब दूर गेल्याच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचललं.

  • फक्त चार दिवसांत तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता वाढली आहे.

  • मानसिक तणाव आणि कामाच्या ओझ्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

संजय गडदे, साम टिव्ही

अंधेरी पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी साडेचार वाजता घरात कुणी नसताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. मुकेश दत्तात्रय देव (वय वर्ष ४५) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश दत्तात्रय देव यांना तीन महिन्यांपासून कावीळचा आजार होता. कावीळचा आजार असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होता. या उपचारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे पोलीस हवालदार तणावात होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते मरोळ L.A. मध्ये नोकरीवर गैरहजर होते.

शनिवारी दुपारी घरात एकटे असताना त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली. "आजार आणि कुटुंबापासून दूर राहिल्याच्या तणावामुळे आत्महत्या करत आहे" असे नमूद केले आहे.

शेजाऱ्यांच्या मदतीने आणि अंधेरी मोबाईल पथकाच्या साहाय्याने त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. सध्या अंधेरी पोलिसांनी एडीआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

चार दिवसांत तीन पोलिसांच्या आत्महत्या

गेल्या चार दिवसांत सलग तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने पोलिस दलातील तणाव, मानसिक आरोग्य आणि कामाच्या ओझ्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पहिली घटना : 13 ऑगस्ट रोजी कांदिवली समता नगर पोलीस ठाण्यातील गणेश राऊळ (32) यांनी नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली.

दुसरी घटना : 14 ऑगस्ट रोजी भाईंदर येथे ऋतिक चौहान (25) या तरुण पोलिसाने गळफास घेतला.

तिसरी घटना : 16 ऑगस्ट रोजी अंधेरीतील मुकेश देव (45) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू असताना मोदी सरकारची मोठी कारवाई; नीट पेपरफुटीप्रकरणी ४७ अधिकारी बडतर्फ

Himachal Pradesh Landslide : काळाचा घाला! टॅक्सीवर दरड कोसळली; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT