MUMBAI CRIME: RICKSHAW WOMAN’S PURSE SNATCHED, TWO ARRESTED BY ANDHERI POLICE saam tv
मुंबई/पुणे

रिक्षाजवळ दुचाकी आणली, महिलेच्या हातावर मारून पर्स हिसकावली नंतर... मुंबई पोलिसांनी उलगडलं रहस्य

Andheri Police Arrest Two Accused In Mumbai Purse Robbery Case: मुंबईतील गुंदवली मेट्रो स्थानकाजवळ रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातावर मारून पर्स हिसकावल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तांत्रिक तपासातून पोलिसांनी जबरी चोरीचा छडा लावला.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातावर जोरात मारून तिच्याकडील पर्स जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या दोन मोटारसायकलस्वार आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या जबरी चोरीचा छडा लावला. २६ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २.२५ वाजता तक्रारदार सुप्रिया दत्ता दर्गे (४०) या विमानतळ टर्मिनल क्रमांक १ येथून डोंबिवलीकडे रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यांची रिक्षा गुंदवली मेट्रो स्थानकाजवळ पोहोचली असता काळ्या रंगाच्या KTM Duke मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम रिक्षाच्या बाजूला आले.

यावेळी मोटारसायकलवर मागे बसलेल्या आरोपीने दर्गे यांच्या डाव्या हातावर जोरात मारून त्यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून घेतली. या पर्समध्ये रोख ३ हजार रुपये होते. आरोपी त्यानंतर मोटारसायकलवरून पसार झाले. या प्रकरणी दर्गे यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची माहिती मिळवून त्यांचा शोध घेतला. त्यानंतर एकलाक मोबीन अन्सारी (२५), रा. वागळे इस्टेट, ठाणे आणि निलेश रामचरण यादव (२२), रा. वागळे इस्टेट, ठाणे यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी एकलाक मोबीन अन्सारी याच्याविरुद्ध पार्कसाईट पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये चोरीचे दोन गुन्हे, तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०२६ मध्ये चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, पोलीस निरीक्षक अतुल निकम, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि रोहन सुर्वे यांच्यासह स.फौ. पेडणेकर, पो.ह. पुजारी, पो.ह. घडवले, पो.ह.शिंदे, पो.ह. म्हात्रे, पो. शि.लोंढे, पाटील या सर्वांनी या कारवाईत सहभाग घेतला. तांत्रिक तपासासाठी पोलीस हवालदार पिसाळ यांनी विशेष मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jr NTR: अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, शुटिंगवेळी झाली होती दुखापत; पुढील ३ महिने घ्यावी लागणार सक्तीची विश्रांती

Maharashtra News Live Update : समाज कल्याण विभागाच्या अर्थसहाय्य शिष्यवृत्ती मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

Government Scheme : विद्यार्थांना दरमहा ₹१,००० मिळणार; योजनेचा लाभ कुणाला मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Pune Tourism : पुण्याजवळील विरंगुळ्याचे ठिकाण, पावसाळ्यात तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ

SCROLL FOR NEXT