Mumbai Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक; मुंबई पोलिसांचं 'ऑपरेशन क्लीन-अप' यशस्वी, टोळी अशी अडकली जाळ्यात

Mumbai Crime News : विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Saam Tv

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी नागरिक आणि भारतीय प्रवाशांची पद्धतशीर लुबाडणूक करणाऱ्या एजंट टोळीचा सहारा रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहार पोलिसांनी रचलेल्या ऑपरेशन क्लीन अप आणि गुप्त सापळ्यात दोन जणांना रंगेहाथ पकडत त्यांची दोन टॅक्सी आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रवाशांची लुबाडणूक आणि जास्त भाडे करून लोट करणाऱ्या अरुण हरिहरनाथ मिश्रा, सुनील चंद्रशेखर शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या हे दोनही आरोपी सहार पोलिसांच्या ताब्यात असून आहेत. या टोळीने किती प्रवाशांची फसवणूक केली किंवा या टोळीत अजून किती जणांचा समावेश आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कार चालकांनी विमानतळ ते जेडब्ल्यु मेरीएट हॉटेल येथे एका अमेरिकन नागरीक आणि एक ऑस्ट्रेलियन नागरिक यांना काही दिवसांपूर्वी दोनशे मीटर अंतरासाठी खोटे सांगून त्यांच्याकडून अवास्तव पैशाची मागणी केली असल्याची तक्रार सहार पोलीस ठाणे येथे करण्यात आली. त्या अनुषंगाने जे डब्ल्यु मेरीएट हॉटेलमध्ये चौकशी केली. त्यानंतर ही बाब खरी असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले. त्यावरुन ३९ वर्षीय ॲग्नल झेवियर डिसुजा यांचा जबाब नोंद करुन सदर दोन मोटार चालकाविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले.

१ आणि २ ऑगस्ट रोजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विमानतळ परिसरात सापळा रचला. टॅक्सी चालक अरुण हरिहरनाथ मिश्रा, सुनील चंद्रशेखर शर्मा यांना अटक केली. तसेच 2 टॅक्सी, दुचाकी: २ वाहनं जप्त केली आहेत. ही धडक कारवाई परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, एसीपी दौलत साळवे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मांजरे आणि त्यांच्या तपास पथकाने केली.v

कायद्याचा बडगा

या कारवाईत विमानतळ परिसरात परदेशी प्रवाशांना फसवून मुंबईची बदनामी करणाऱ्या टोळीची धिंड काढण्यात आली. वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखालील ही मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा सहार पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT