Black Box : विमानाप्रमाणे ट्रॅक्टरला ब्लॅकबॉक्स लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचा निर्णय; कोल्हापुरातून पहिला विरोध

black box gps technology : विमानाप्रमाणे ट्रॅक्टरला ब्लॅकबॉक्स बंधनकारक लावणे असणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाला कोल्हापुरातून पहिला विरोध करण्यात आला आहे.
Satej patil
black box gps technologySaam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : स्मार्ट डिव्हाइसच्या मदतीने देशातील रस्ते दुर्घटना कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता शेतकऱ्यांना विमानाप्रमाणे ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स लावणे बंधनकारक असणार आहे. या ब्लॅकबॉक्समुळे अपघाताचं कारण समजणार आहे. ब्लॅकबॉक्स लावणे एप्रिल २०२६ रोजीपासून बंधनकारक असणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाला कोल्हापुरातून पहिला विरोध करण्यात आला आहे.

Satej patil
Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

देशात ट्रॅक्टर अपघाताचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. या ब्लॅकबॉक्समुळे अपघातावेळी ट्रॅक्टरचा वेग, ब्रेकचा वापर, स्टेअरिंगचा वापर रेकॉर्ड होणार आहे. ब्लॅकबॉक्समधील डेटा अपघाताचा तपास, कायदेशीर कारवाई, वाहन सुरक्षेतील दुरुस्तीसाठी वापर केला जाईल. ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला जीपीएस प्रणाली देखील असणार आहे.

Satej patil
Dadar Kabutar Khana : कोर्टाचे आदेश पायदळी, कारच्या छतावर कबूतरांसाठी खाद्य ठेवलं; काही तासांत पोलिसांनी माज उतरवला

नव्या निर्णयाबाबत संबंधित मंत्रालयाने १८ जुलै रोजी अधिसूचना जारी केली. सरकारच्या निर्णयानुसार ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये जीएपीएस प्रणालीसाठी लावण्यासाठी ऑक्टोबर २०२६ आणि ईडीआरसाठी एप्रिल २०२७ तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Satej patil
Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाला पहिला विरोध कोल्हापुरातून झाला आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅकबॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध झाला आहे. विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. राज्यातील ट्रॅक्टरधारकांना एकत्र करून जोरदार विरोध करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. देशातील 90 लाख ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय बंधनकारक केल्याने आमदार सतेज पाटील यांनी विरोध दर्शवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com