Mumbai Gold Smuggling Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यासह ५ जणांना अटक, ५ कोटींचे तस्करीचं सोनं जप्त

Mumbai Gold Smuggling : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले. भाजपशी संबंधित एका पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai airport gold smuggling case : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाशी (भाजप) संबंधित एका पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित आचरेकर यांचा समावेश असून, ते भाजपच्या कामगार संघटनेत चिटणीस म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. आचरेकर यांच्यासोबत रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान आणि फलिल मोहम्मद कासिम यांनाही आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

डीआरआयने (DRI) काल पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरात ही कारवाई केली. संशयास्पद हालचालींवरून अधिकाऱ्यांनी या आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या सखोल तपासात हा मोठ्या प्रमाणावरील सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच अजित आचरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला होता, ज्यानंतर त्यांच्यावर कामगार संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

डीआरआयच्या प्राथमिक तपासात जप्त केलेल्या सोन्याची किंमत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास आता यंत्रणा करत आहे. तसेच, या तस्करीसाठी परदेशातील कोणत्या टोळ्यांचे किंवा व्यक्तींचे नेटवर्क वापरले गेले होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची, परदेश दौऱ्यांची आणि संपर्कांची माहिती तपास यंत्रणा गोळा करत आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत डीआरआयकडून (DRI) अद्याप कोणतीही अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजित दिपके आजपासून आमरण उपोषण करणार

Dharashiv : तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट, धाराशिवमधील धक्कादायक घटना; फोटो पाहून अंगावर काटा येईल

Gold Rate Today : आज सोन्याचे दर घसरले की वाढले? जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेटचे आजचे भाव

Sprout Benefits: उकडलेले कडधान्य कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खायला सुरूवात कराल

Famous Actress Death : ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT