15 km long queue of heavy vehicles on the Mumbai-Ahmedabad Highway; traffic congestion continues for the fourth day. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Ahmedabad Highway: अवजड वाहनांच्या 15 किलोमीटरपर्यंत रांगा; चौथ्या दिवशीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai-Ahmedabad Highway : अवजड वाहनांच्या १५ किमीपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. सलग चौथ्या दिवशी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला. प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना, शाळकरी मुलांना आणि ग्रामस्थांची गैरसोय होतेय.

Bharat Jadhav

  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सलग चौथ्या दिवशी भीषण वाहतूक कोंडी झालीय.

  • १५ किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

  • चाकरमानी, शाळकरी मुले आणि ग्रामीण नागरिक त्रस्त झालेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सलग चौथ्या दिवशीही भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर १० ते १५ किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या कोंडीचा फटका चाकरमान्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही बसला आहे. तर परिसरातील शाळकरी मुलांना किलोमीटर पर्यंत शाळेत पायी चालत जावं लागत आहे. (Massive Traffic Jam On Mumbai-ahmedabad Highway For Fourth Consecutive Day)

स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडी होतेय. या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलं, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या कोंडीत दहिसरच्या शारदाश्रम शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थी पिकनिकवरून परतताना अडकले होते.

शारदाश्रम शाळेतील मुलांची 12 बसेस काल(14 ऑक्टॉबर) सकाळी वजेश्र्वरी येथील एका रिसॉर्टवर पिकनिकसाठी निघाले होते. पिकनिक आटपून या शाळेतील मुलं पुन्हा दहिसर येथे निघाले असताना त्यांच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या. दरम्यान याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळवण्यात आले. त्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे सांगून विद्यार्थ्यांची सुटका केली.

जिल्हाधिकारी यांनी नियोजनाच्या त्रुटी मान्य केल्या. अवजड वाहनांच्या अनियंत्रित हालचालीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान गेल्या तीन दिवसापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जॅम होतोय. आजही या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे ते घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT