PALGHAR HIGHWAY ACCIDENT: 16 INJURED AFTER MINI BUS TYRE BURST Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसला अज्ञात वाहनाची धडक; १६ जण गंभीर जखमी

Mumbai-Ahmedabad Accident News : पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टायर फुटल्याने मिनी ट्रॅव्हलर बसला भरधाव वाहनाची धडक बसली. या अपघातात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

  • मिनी ट्रॅव्हलरला मागून भरधाव वाहनाची धडक

  • 16 प्रवासी गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

रुपेश पाटील, पालघर

पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा परिसरात दुपारी भीषण अपघात घडला. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मिनी ट्रॅव्हलर बसचा टायर अचानक फुटल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत मिनी ट्रॅव्हलरमधील तब्बल १६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी ट्रॅव्हलर बसमध्ये प्रवासी गुजरातमधून मुंबईकडे प्रवास करत होते. चिंचपाडा भागात पोहोचताच बसचा टायर फुटला. चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस रस्त्यावरच थांबली. त्याच वेळी मागून येणाऱ्या वेगवान वाहनाला वेळेत ब्रेक लावता न आल्याने त्याने थेट बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक वाहनांची रांग लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या आणि काही वेळातच मार्ग मोकळा करण्यात आला. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पालघरमध्ये विचित्र अपघात

पालघरच्या नानिवली येथे आज पहाटे आढळून आलेल्या दोन मित्रांच्या मृतदेहांचा अखेर उलगडा . लग्नसराईतून घरी परतत असताना बाईक वरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बाईक इलेक्ट्रिक पोल नंतर झाडावर आदळली . अपघातात पंधरा वर्षीय वैभव लहांगे याचा जागीच मृत्यू झाला, तर मित्राचा मृत्यू झाल्याचं समजतात बाईकवरील जखमी मित्र नितीन वरठा याने देखील शेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . अपघाताचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

Maharashtra News Live Update: बारवे कचरा प्रकल्पाला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू ; पुतण्यासह तीन जण जखमी, राजकीय वर्तुळात शोककळा

Accident News : महामार्गावर भयंकर अपघात! उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

Mumbai : मुंबईत मोठा घोटाळा! SRA प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार; ED आणि SEBI कडे तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT