Mumbai-Ahemdabad Bullet Train Project Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; बीकेसी-शिळफाटादरम्यान बोगदा पूर्ण, वाचा सविस्तर

umbai-Ahmedabad Bullet Train update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट आलीये. बीकेसी-शिळफाटादरम्यान बोगदा पूर्ण झालाय.

Vishal Gangurde

Mumbai-Ahmedabad bullet train project: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गुरुवारी मुंबईतील 'बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स' ते ठाण्यातील शिळफाटादरम्यान २.७ किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. या उपलब्धीमुळे या प्रकल्पाला चालना मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातील २१ किलोमीटर बोगद्यांपैकी ५ किमीचा बोगदा शिळफाटा ते घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग मेथड वापरून बांधला जात आहे. तर उर्वरित १६ किलोमीटरचा बोगदा टनेल बोरिंग मशीनने वापरला जात आहे. या बोगद्यात ठाण्याच्या खाडीखाली ६ किलोमीटर तर समुद्राखालील भागाचा समावेश आहे.

एनएटीएम भागात बोगद्याचे काम जलद करण्यासाठी, एक अतिरिक्त चलित मध्यवर्ती बोगदा बांधण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घणसोली आणि शिळफाटाच्या बाजूने एकाच वेळी उत्खनन करण्यात आलं. आजूबाजूंच्या संरचनांनाही कोणतं नुकसान न होता सुरक्षित आणि नियंत्रित बोगदा बांधकाम उपक्रम सुनिश्चित करण्यासाठी, ग्राऊंड सेटलमेंट मार्कर, पायझोमीटर, इन्क्लिनोमीटर, स्ट्रेन गेज आणि बायमेट्रिक अॅक्सेस कंट्रोल सिस्टमसह साइटवर व्यापक सुरक्षा उपाय लागू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकल्पाचं काम करताना पायाभूत सुविधा आणि घरांना प्रभावित न करताना सुरक्षित आणि नियंत्रित बोगदा बांधकाम सुनिश्चित करणयासाठी रचना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, याप्रकल्पातील रेल्वे मार्गाचं एकमेव भूमिगत स्थानक असलेले मुंबई बुलेट ट्रेन स्थानक हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. या स्थानकाचं प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 26 मीटर खोलीवर असणार आहे. तर स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे एकूण तीन मजले असतील.

या कामासाठी सुमारे 32 मीटर (अंदाजे 100 फूट) खोलपर्यंत उत्खनन करण्यात येणार आहे. एकंदरीत हे सुमारे 10 मजली इमारतीच्या उंचीच्या बरोबरीचे आहे. या स्थानकांत एकूण ६ प्लॅटफॉर्म असणार आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे 415 मीटर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' घरबसल्या पाहा; सुबोध भावेचा चित्रपट ओटीटीवर, वाचा अपडेट

Public Toilet Risk: शौचालयातील हँड ड्रायरमुळे आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Jalgaon Corporation Election : जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा करिश्मा करणार? महाविकास आघाडीचा लागणार कस

Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

Nanded Heavy Rain : नांदेड शहराला पावसाचा फटका; नांदेड ते मुदखेड महामार्गावरील वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT