Mumbai-Ahmedabad Bullet Train Palghar Project  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमधील ४५४ मीटर लांबीच्या टनेलचे काम पूर्ण

Mumbai-Ahmedabad Bullet Train Palghar Project : पालघर जिल्ह्यात मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या टनेलचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. NATM तंत्रज्ञानाने अवघ्या 12 महिन्यांत हा बोगदा पूर्ण करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसाठी महत्त्वाचा टनेल पूर्ण

  • अत्याधुनिक NATM तंत्रज्ञानाचा वापर

  • अवघ्या 12 महिन्यांत खोदकाम पूर्ण

  • मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मोठी गती

मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघर जिल्ह्यात मोठं यश मिळालं आहे. पालघरमधील बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या टनेलचं काम तब्बल बारा महिन्यांनंतर आज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं आहे. अत्याधुनिक न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीने (NATM) या बोगद्याचं खोदकाम करण्यात आलं असून, हा टनेल सुमारे ४५४ मीटर लांब आणि १४.४ मीटर रुंद आहे. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अप आणि डाऊन ट्रॅकसाठी हा टनेल तयार करण्यात आला आहे.

कठीण डोंगराळ भागातून जाणाऱ्या या मार्गासाठी अत्यंत आधुनिक ड्रिलिंग तंत्रज्ञान आणि नियंत्रित स्फोटांचा वापर करून हे काम पूर्ण करण्यात आलं. अवघ्या बारा महिन्यांत हे खोदकाम पूर्ण होणं ही या प्रकल्पासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीमध्ये भूप्रदेशाची रचना लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने खोदकाम केलं जातं. त्यामुळे सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जात असून, कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणाही वाढतो.

याच पद्धतीचा वापर करून पालघरमधील हा बोगदा उभारण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एकूण सात माउंट टनेल उभारण्यात येणार असून, त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित टनेल्सचं कामही वेगाने सुरू असून, येत्या काळात या प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही देशातील पहिली हाय-स्पीड रेल सेवा ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पालघरमधील टनेलचं काम पूर्ण झाल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी ही बाब निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सत्ताधारी कामे मंजूर करून खोटी बिलं काढतात, शेकाप नेते जयंत पाटील यांचा आरोप

Prajakta Gaikwad: प्राजक्ता साकारणार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका; 'भिडेवाडा' चित्रपटाची भव्य घोषणा

Bridal Skincare Tips: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? लग्नाच्या शेवटच्या महिन्यात या 5 गोष्टी करा

लोकलचा जीवघेणा प्रवास; वर्षभरात 2287 प्रवाशांचा मृत्यू, अपघाताचा आकडा हादरवणारा

Box Office Collection: 'बॉर्डर 2' आणि 'मर्दानी 3' काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT