Mumbai Accident News Yandex
मुंबई/पुणे

Mumbai Accident : ड्युटी संपवून घरी जात होते आजोबा; पाठीमागून स्कूल बस आली अन्...

Dahisar Accident News : ड्युटी संपवून घरी पायी निघालेल्या ७१ वर्षीय सुरक्षा रक्षकाला स्कूल बसने धडक दिली. यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. दहीसरमध्ये ही दुर्घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाचा स्कूलबसच्या धडकेत मृत्यू झाला. ते नाइट शिफ्ट संपवून पायी घराकडे निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर काही वेळाने स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

मोहन मुदिक असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. बुधवारी ते रात्रपाळीवर होते. गुरुवारी सकाळी ते कामावरून घरी पायी जात होते. त्याचवेळी त्यांना पाठिमागून येणाऱ्या स्कूलबसने धडक दिली. यात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दहिसर पूर्वेकडील अशोकवन परिसरात झाला. बोरिवली पूर्वेकडे काजुपाडा परिसरात राहणारे मुदिक यांचा या अपघातात मृत्यू झाला.

मुदिक हे सकाळी ड्युटीवरून घरी पायी जात होते. त्याचवेळी अरविंद गणपत कापसे हा स्कूलबस घेऊन निघाला होता. तिथल्याच एका स्टॉपवरुन त्याने शाळेतल्या मुलांना बसमध्ये बसवले आणि तो निघाला. त्याचवेळी त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. पायी जाणाऱ्या मुदिक यांना बसची जोरदार धडक बसली. अपघातानंतर कापसे याने एक रिक्षा थांबवली. पायी जाणाऱ्या लोकांच्या मदतीने त्याने मुदिक यांना रिक्षात बसवले आणि शताब्दी रुग्णालयात नेले. मुदिक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कापसे तेथून निघून गेला.

पोलिसांनी सांगितले की, या अपघाताच्या घटनेबाबत रुग्णालयातून माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी बसचालक कापसे याला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT