BMC
BMC  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: पालिका निवडणुकांच्या तोंडावर रस्ते दुरुस्तीला वेग

सुरज सावंत

मुंबई - रस्त्यांची स्थिती आता लवकर सुधारेल अशी आशा निर्माण झाली आहे . कारण पालिका निवडणुकांच्या तोंडावर पालिकेने रस्ते दुरुस्तीसह काँक्रीटीकरणावर भर दिला आहे . येत्या वर्षभरात मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर तब्बल २ हजार २०० कोटी , तर पूल दुरुस्तीवर १३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

यावेळी मुंबईतल्या २१९ किलोमीटर रस्त्यांची (Road) दुरुस्ती केली जाणार आहे , पैकी २०६ किमी रस्ते पूर्ण काँक्रीटीकरण केले जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार नाही. परिणामी पालिकेच्या पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे.

हे देखील पहा -

मुंबईतल्या काही पुलांची स्थिती खराब असल्याने यावर्षी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २१ पुल पाडून नवे पुल बांधण्यात येत आहे. तर ४७ पुलांच्या मोठ्या प्रमाणात आणि १४४ पुलांच्या किरकोळ दुरस्ती करण्यात येणार आहे.

मुंबईतल्या रस्त्यांच्या स्थिती वरून आणि रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबईकरांची पुरती वाट लागत असते. त्याचा परिणाम मुंबईकर नाराज होऊन पालिका निवडणुकांच्या मतदानावर होऊ शकतो. म्हणूनच पालिकेने रस्ते दुरुस्तीवर आता अधिकाधिक खर्च करून चकचकीत रस्ते मुंबईकरांना देण्याचं ठरवलं आहे. पण त्याचा किती फायदा निवडणुकीत होतं, हे मतदानंतर स्पष्ट होणार आहेचं. पण मुंबईकर चांगल्या रस्त्याची अपेक्षा करतात त्याची निदान पूर्तता आता होईल अशी अपेक्षा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut Net Worth : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; कंगनाची संपत्ती वाचून डोळेच फिरतील, शिक्षण किती झालंय माहितीये?

Nashik Loksabha: नाशिकमध्ये मराठा समाजाची महाविकास आघाडीला साथ! २ उमेदवारांना पाठिंबा जाहीर; महायुतीचं टेन्शन वाढणार?

Expensive Mango in World: हापूस न्हवे, 'या' देशातील आंबा आहे सर्वात महाग

Latur News: शुभमंगल सावधान! पोलीस ठाण्याच्या दारातच वाजली सनई, लातूर पोलिसांनी लावलं प्रेमीयुगुलाचं लग्न

Virat Kohli: सुनील छेत्रीच्या रिटायरमेंट पोस्टवर विराटची भावुक करणारी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT