ACB Action Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईमध्ये लेखा अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

ACB Big Action In Mumbai: मुंबईमध्ये एसीबीने मठी कारवाई करत लेखा अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या कारवाईमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. राज्य कामगार विमा योजनेचा लेखा अधिकाऱ्याला लाच घेताना एसबीने रंगेहाथ पकडले. ५० हजारांची लाच घेताना राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला एसबीने अटक केली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. या लेखा अधिकाऱ्याच्या घराची देखील झडती घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य कामगार विमा योजनेचे लेखा अधिकारी तथा सहाय्यक संचालक जितेंद्र साखरकर यांना एसीबीने अटक केली. एसीबीने वरळी येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. वैद्यकीय उपकरण पुरवठा करणाऱ्या कंपनीचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी साडेसात लाखांची लाच मागितली होती.

संबंधित कंपनीला वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी १६ कोटी २८ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात आले होते. कंपनीने उपकरणांचा पुरवठा करून बिल मंजुरीसाठी कार्यालयात जमा केले होते. मागील ७ महिन्यांपासून बिल प्रलंबित असल्याने तक्रारदार अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत होता. बिल मंजूर झाल्यानंतर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी अधिकाऱ्याने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी कंपनीचे ७ कोटी ५० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. त्यानंतर कामाच्या मोबदल्यात ७ लाख ५० हजार रुपयांची लाच लेखा अधिकाऱ्याने मागितली. तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून लेखा अधिकाऱ्याला अटक केली. ही कारवाई करताना लेखा अधिकाऱ्याला ५० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले. एसीबीकडून अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. एसीबीच्या पथकाकडून या अधिकाऱ्याच्या घराची झडती सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Forts : कोकणातील जलदुर्गांचा थाटच न्यारा! हिवाळ्यात आवर्जून फिरा मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारे ६ भव्य किल्ले

खासगी आयुष्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर; राहुल गांधींनी सांगितला प्रेयसीसोबतच्या 'त्या' खास डेटचा अनुभव

Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का; विश्वासू शिलेदाराचा शिवसेनेत प्रवेश, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला

SCROLL FOR NEXT