Mumbai Lakes  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dams water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत ८० टक्के जलसाठा, तरीही पाणीकपात कायम, कारण...

Mumbai Water Supply News : जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र जून महिन्यांत ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात ती कसर भरुन काढली. जुलै महिन्यात राज्यभरात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावामधून पाणीपुरवठा होतो. या सातही तलावांत 80 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पुढील 300 दिवस म्हणजेच मेअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी सध्या तलावांमध्ये उपलब्ध आहे. असं असलं तरी मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने आठवडाभर पुढे ढकलला आहे. (Latest News)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याच समजतंय.

तलावांमधील पाणीसाठा

  • अप्पर वैतरणा - 140240 दशलक्ष लिटर

  • मोडकसागर - 128925 दशलक्ष लिटर

  • तानसा - 143769 दशलक्ष लिटर

  • मध्य वैतरणा - 187208 दशलक्ष लिटर

  • भातसा - 522032 दशलक्ष लिटर

  • विहार - 27658 दशलक्ष लिटर

  • तुळशी - 8046 दशलक्ष लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT