Badlapur News: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हारफ्लो झालं आहे. बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या ९ दरवाजांमधून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आमदार किसन कथोरेंनी या धरणाचं जलपूजन केलं आहे. (Latest Marathi News)
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाची ड्रोनच्या सहाय्याने विहंगम दृश्य देखील टिपण्यात आलीत.
बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने बारवी धरण 1 ऑगस्टरोजीच ओव्हरफ्लो झालं, मागील वर्षी ११ ऑगस्ट रोजी बारवी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे बारवी धरणावर येऊन जलपूजन केलं. बारवी धरणाच्या ११ पैकी नऊ दरवाजातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जुलै महिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. मुसळधार पावसाने बदलापूरात पूरसदृश्य परिस्थिती देखील उद्भवली होती. जुलै महिण्यात बरसलेल्या या मुसळधार पावसानेच बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झालं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.