Mumbai 13/7 Blasts Case: Zainul Sheikh Granted Bail After 15 Years Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai 2011 Bomb Blast : १२ मिनिटात ३ बॉम्बस्फोट; १५ वर्षांपूर्वी मुंबई हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai 2011 Bomb Blast Update News : मुंबई २०११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी झैनुल शेखला जवळपास १५ वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर विशेष MCOCA न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Alisha Khedekar

  • मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी झैनुल शेखला जामीन मंजूर

  • १३ जुलै २०११ रोजी मुंबईत महत्त्वाच्या ३ ठिकाणी बॉम्बस्फोट

  • २६ जणांचा जागीच मृत्यू, १३० जण गंभीर जखमी

संजय गडदे, मुंबई

मुंबई म्हणजे मायानगरी. या मायानगरीत अनेकांची स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आहे. मुंबईने आजपर्यंत अनेक धक्के सहन केलेत. अगदी दहशतवादी हल्ला असो नाहीतर बॉम्बस्फोट. मुंबईवर आलेला असाच काळा दिवस म्हणजे १३ जुलै २०११. नेहमीप्रमाणे दिवस उजाडला नोकरदारवर्ग कामाच्या दिशेने निघाले. अगदी सगळं सुरळीत सुरु असताना संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी पुढच्या १२ मिनिटांमध्ये मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी अचानक स्फोट झाला. या स्फोटात २६ जणांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील आरोपी झैनुल शेख याला विशेष MCOCA न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. जवळपास १५ वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर आणि याच प्रकरणातील काही सहआरोपींना यापूर्वी जामीन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ‘पॅरिटी’च्या आधारावर हा निर्णय घेतला.

विशेष MCOCA न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर. नवनदर यांनी स्पष्ट केले की, आरोपीवरील आरोप गंभीर आहेत. मात्र, जामीन अर्जावर निर्णय घेताना अभियोजन पक्षाच्या पुराव्यांबाबत कोणतेही अंतिम मत व्यक्त केलेले नाही. झैनुल शेखच्या दीर्घ कारावासाचा कालावधी आणि सहआरोपींना मिळालेल्या जामिनातील समानता हे निर्णयातील प्रमुख मुद्दे ठरले.

झैनुल शेख २०१२ पासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचे वकील वहाब खान यांनी दीर्घकाळ झालेली कैद आणि सहआरोपींना मिळालेल्या जामिनाचा आधार घेत सुटका करण्याची मागणी केली. नक्वी अहमद वसी अहमद शेख आणि हारून राशीद अब्दुल हमीद नाईक या सहआरोपींना यापूर्वी जामीन मिळाला आहे. सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी जामिनाला विरोध केला.

आरोपीविरोधात कबुलीजबाब आणि CCTV फुटेजसारखे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आतापर्यंत २२७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून खटला अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जवळपास १५ वर्षे अंडरट्रायल म्हणून तुरुंगात राहिल्याची बाब दुर्लक्षित करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. जामिनासाठी झैनुल शेखला १ लाख रुपयांचा बाँड आणि तेवढ्याच रकमेच्या सक्षम स्थानिक जामीनदाराची हमी देण्याचे निर्देश देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Maharashtra News Live Update: शिवसेना कोणाची? सुनावणी संपली, १६ तारखेला शिंदे गट पुन्हा करणार युक्तीवाद

Suntwada Recipe: कृष्ण जन्माष्टमीला घरच्या घरी बनवा पारंपरिक सुंठवडा; साहित्य अगदी मोजकंच

Eyebrow : आयब्रोचे केस पातळ झालेत? या ७ आजारांची असू शकतात गंभीर लक्षणं

Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT