राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत रमेश परदेशी यांना कार्यकर्त्यांसमोर सुनावलं होतं.
रमेश परदेशी यांनी आरएसएसच्या संचलनाचा फोटो पोस्ट केला होता.
रमेश परदेशी पुन्हा नव्या फेसबूक पोस्ट केलीय.
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी हे आपल्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेत आलेत. रमेश परदेशी यांनी मनसेच्या इंजिनमधून उतरत भाजपमध्ये प्रवेश केलाय. काही दिवसापूर्वी पुण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी त्यांना सुनावलं होतं. रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आहेत.
मात्र काही दिवसापूर्वी परदेशी यांनी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला होता. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना कार्यकर्त्यांसमोरच सुनावले होतं. त्या घटनेची राजकीय वर्तुळात खूप चर्चा झाली होती.
आता रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. या पोस्टमध्ये ते संघाच्या गणवेशात दिसत आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये, 'मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम ..', अशी कॅप्शन लिहिलंय. या पोस्टमुळे आता परदेशी हे भाजपामध्ये करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान राज ठाकरे यांनी बैठकीत कामगिरीबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. या बैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष रमेश परदेशी यांना सुनवालं होतं.त्याच बैठकीत राज ठाकरेंनी रमेश परदेश यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केल्यावरून सुनावलं होतं. या पोस्टमध्ये परदेशी यांनी संघाचा कट्टर कार्यकर्ता अशा आशयाचा हा फोटो होता. छातीठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे. टाईमपास कशाला करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा,” असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांना सुनावलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.