मुळशी तालुक्यातील गुटके गाव भयभीत, माळीन सारखी दुर्घटना होण्याची शक्यता दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

मुळशी तालुक्यातील गुटके गाव भयभीत, माळीन सारखी दुर्घटना होण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यात शेवटचे टोक असलेले गाव म्हणजे गुटकेगाव.

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : पुणे Pune जिल्ह्यामधील मुळशी Mulshi तालुक्यात शेवटचे टोक असलेले गाव म्हणजे गुटकेगाव Gutke. या गावामधील नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहे. पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या, की गावामधील ग्रामस्थ येथील एका मंदिरात जाऊन बसतात,आणि देवाचा धावा करतात. जीवाच्या भीतीने, गुटके गावामधील नागरिक आपले जीवन जगत आहे. सहयाद्रीच्या Sahyadri कुशीत वसलेले हे जेमतेम शंभर कुटुंबियांचे हे गांव या गावाला चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेे आहे.

या ठिकाणी निसर्गाचे वरदान आहे. मात्र, या गावामधील डोंगराला ३ वर्षांपासून मोठ्या भेगा पडू लागतर आहेत. कधी डोंगर गावावर येऊन कोसळेल, हळूहळू येथे भूस्खलन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या ठिकाणील ग्रामस्थांनी आरोप केले आहे की, प्रशासन येत आणि आश्वासन देऊन जातं, असे ३ वर्ष ग्रामस्थांच्या जीवाचा थरकाप उडाला आहे.

हे देखील पहा-

पुणे जिल्ह्यामधील माळीण सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता कुठेतरी प्रशासनाने administration या गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण आमचे पुनर्वसन जवळच्या गावातच करावे, आमची गुरेढोरे लेकरं इथेच राहतात. जरी प्रशासनाने यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले, तरी त्याला किती दिवस लागणार हे नक्की माहिती नाही.

मात्र, गुटके गावामधील ग्रामस्थ रोज मरण यातना सहन करत आहे. जीव मुठीत घेऊन, रात्र जागूनच काढत आहेत. कधी हा डोंगर खचेल आणि आमचा जीव जाईल, त्यापेक्षा झोपायच नाही असा निर्धार इथल्या नागरिकांनी केला आहे. तर दुसरीकडे विशेष या गावामधील तरुणाई नोकरी निमित्ताने, पुणे- मुंबईत जाऊन राहत आहेत. सध्या या गावात फक्त वृद्ध राहतात.

अनेक पावसाळे बघितले मात्र, मागील ३ वर्षांपासून पावसाळा नको म्हणत आहे. कारण चिपळूण, माळीण या सारखी मोठी घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न या भोळ्या भाबड्या ग्रामस्थांना पडला आहे. तर दुसरीकडे आमदार, खासदार फक्त मते मागायला या गावचा उंबरठा झिजवतात, एकदा मतांचे राजकारण झाले की पुन्हा ते इकडे फिरकत ही नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात येतो मुळशी तालुका आणि हे शेवटचे गाव आहे. जगाचा पोशिंदा जाणता राजा या ग्रामस्थांचे जन जीवन सुरळीत करणार का तेच पहावे लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT