Narendra Dabholkar Case : Saam tv
मुंबई/पुणे

Narendra Dabholkar Case : 'आम्ही निकालावर समाधानी, पण...'; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर मुलांची पहिली प्रतिक्रिया

Narendra Dabholkar Case latest news : आजच्या निकालात शरद कळसकर आणि सचिन अंडूरे याच्यावर गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना पाच लाखांच्या दंडासहित जन्मठेप मिळाली आहे. तर तिघे निर्दोष झाले आहेत. यावर दाभोलकर हत्या प्रकरणावरील निकालावर कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Vishal Gangurde

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल ११ वर्षांनी लागला आहे. पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आजच्या निकालात शरद कळसकर आणि सचिन अंडूरे याच्यावर गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना पाच लाखांच्या दंडासहित जन्मठेप मिळाली आहे. तर तिघे निर्दोष झाले आहेत. यावर दाभोलकर हत्या प्रकरणावरील निकालावर कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

मुक्ता दाभोलकर काय म्हणाल्या?

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणावरील निकालावर भाष्य करताना त्यांची मुलगी मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की'गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास ,नालासोपारा शस्त्रसाठा या दोन तपासामुळे २०१८ साली सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पकडण्यात आलं. त्याच्या आधी पाच वर्ष एका टप्प्यावर तपास येऊन थांबला होता. या प्रकरणातील खरे शुटर होते, त्यांना शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सर्व माध्यमांनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर अकरा वर्षांनी विवेकाच्या मार्गाने न्याय मिळतो. लोकशाहीसाठी देखील ही उपकृत भावना आहे, असे मुक्ता दाभोलकर पुढे म्हणाल्या.

'आम्ही या निकालावर समाधानी आहोत. तर या प्रकरणात निर्दोष सुटलेल्यांच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. हमीद दाभोलकर काय म्हणाले?

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, 'न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो. दाभोलकरांच्या हत्येनंतर आम्ही येथील कायदा सुवस्थेवर विश्वास ठेवत होतो. आज या प्रकरणातील दोघांना शिक्षा झाली आहे. हा एक प्रकारे न्याय झाला आहे. सुटलेले तीन आरोपींविरोधात उच्च आणि सुप्रीम कोर्टात ही लढाई घेऊन जाऊ.

'प्रत्यक्षात माणसाला मारून त्याचे विचार संपत नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचाराचे काम सुरु आहे. ज्या विचारधारांकडे संशयाची सुई होती, त्यावर आज कोर्टाच्या निकालावर शिक्कामोर्तब झाला आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली आहे. जे सूत्रधाराला अटक झाली नाही. इतर सूत्रधारांवर देखील शिक्षा झालेली नाही', असे डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या IA चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Car Tire Pressure: पावसाळ्यात गाडीच्या टायरचा योग्य दाब किती असावा? गाडी चालवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT