Ladki Bahin Yojana Saam tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' अर्जाची मुदत वाढवली, आता कधीपर्यंत आणि कुठे भरता येणार अर्ज? जाणून घ्या

Vishal Gangurde

मुंबई : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज १५ ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहे. त्यामुळे आता लाभ न घेतलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज न भरलेल्या महिलांना मोठा दिलासा सरकारने दिला आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज सुरुवातीला ऑनलाईन भरता येत होता. मात्र, सरकारने योजनेत मोठा बदल केला. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता फक्त अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातूनच भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रात स्वीकारले जात आहेत. या संदर्भातील जीआर देखील सरकारच्या वतीने जारी केलाय. या योजनेची अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, मदत कक्षप्रमुख, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज भरता येत होता. मात्र, नव्या जीआरनुसार लाडकी बहीण योजनेचा अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रात भरता येणार आहे.

लाडकी बहीण योजनेनुसार पात्र अर्जदार महिलांना १५०० रुपये दिले जातात. सरकारने पात्र अर्जदारांना तीन हप्ते आधीच दिले आहेत. तसेच काही पात्र अर्जदारांना चौथा आणि पाचव्या महिन्याचा हप्ता देखील मिळाला आहे. सरकारने दिवाळीपूर्वी पात्र अर्जदारांना दोन आगाऊ हप्ते दिले आहेत. दोन महिन्यांचे एकूण ३००० हजार रुपये सरकारने पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही, त्यांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यांचे ७५०० रुपये मिळणार आहेत. त्यातच सरकारने अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Fare: ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागणार

Maharashtra News Live Updates :पुण्यात शहरातील अनेक भागात पावसाची हजेरी

Job Recruitment: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executiveपदांसाठी भरती; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

Maharashtra Politics : दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक

Thackeray Vs Shinde : दसरा मेळाव्याआधीच शिंदे - ठाकरे गट आमनेसामने! कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT