Ladki Bahin Yojana Installation: लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Money Saam TV
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana Installation: लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली

Satish Daud

राज्यातील महायुती सरकारने गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत महिलांना दर महिन्याला प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत खरपूस समाचार घेतला.

आम्ही लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आणली. त्यात काही त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील. पण विरोधकांनी लगेच हुरळून जाऊन टीका करू नये. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही महिलेला योजनेचा फॉर्म भरण्यासाठी एक रुपयाही द्यायची गरज नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतील भाषणात म्हटलं होतं. त्यांच्या या भाषणाचा देखील अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. महिलांना प्रतिवर्ष १ लाख रुपये तुम्ही देताय म्हणजे सरकारवर २.५ कोटींचा बोजा पडेल. आपले बजेट किती आणि आपण एवढं देणार कसं. खिसा फाटका असला तर देणार काय", असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

"देशाचं जरी म्हटलं तरी २५ लाख कोटी लागतील. काही पटेल असं तर बोला. अजित पवारांनी दिलेल्या वादा आम्ही पूर्ण केला. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आता कसले तुम्ही महिन्याला साडेआठ हजार रुपये देताहेत. मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही एक दमडीही दिली नाही", असा घणाघात अजित पवार यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांकडून सरकारी अधिकारी पैसे (Ladki Bahin Scheme) घेत असल्याचा तक्रारी समोर आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना देखील अजित पवार यांनी सज्जड दम दिलाय. जो कुणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी पैसे घेत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

काही लोकांना फक्त व्हिडीओ काढायचा उद्योग लागला आहे. काढायचे व्हिडीओ आणि टाकायचे. असं म्हणत महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका, तुमच्याकडे कुणी पैसे मागत असेल तर आम्हाला सांगा, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न अनेकांना होता.

या प्रश्नाचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होतील. १ जुलैपासूनच पहिल्या हप्त्याची तारीख पकडली जाईल. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारने तारीख वाढवून दिली आहे. त्यामुळे महिलांनी जास्त गर्दी करू नये, वेळ आल्यास आणखी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Price Hike : टोमॅटो कापणार सामान्य माणसांचा खिसा; उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ

BJP Politics: भाजपकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू; रात्री उशिरापर्यंत खलबतं, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

Marathi News live update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे सेवेवरही परिणाम

Mumbai Rain Video: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय!

MPSC: एमपीएससीमार्फत आता शिपाई पदांची भरती होणार; GR जारी, अंमलबजावणी केव्हापासून होणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT