अँटिलियासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा तपास करताना सचिन वाझेंकडून हस्तक्षेप- एटीएस Saam Tv
मुंबई/पुणे

अँटिलियासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा तपास करताना सचिन वाझेंकडून हस्तक्षेप- एटीएस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाजवळ वर्षभर अगोदर आढळून आलेल्या स्फोटकांनी (Explosive) भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या (ATS) अहवालातून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. यामुळे निलंबित पोलीस (Police) अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी (Accused) असलेल्या सचिन वाझेंचा (Sachin Vaze) पाय आणखी खोलामध्ये गेला आहे. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थान बाहेर आढळून आल्याचे समजताच वाझेंनी काय केले आहे, याची धक्कादायक माहिती अहवालामध्ये मिळाली आहे. (mukesh ambani antilia security scare sachin vaze went scorpio car frequently claims)

हे देखील पहा-

स्फोटकांनी भरलेली कार अँटिलियाबाहेर उभी असल्याचे समजताच बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पथकाकडून शोधकार्य सुरू असतानाच तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे घटना ठिकाणी दाखल झाले होते. बराचवेळ ते स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारजवळ (car) उभे होते. पथकाला कारची तपासणी करायची असल्यामुळे त्यांना लांब जाण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तरी देखील वाझे वारंवार कारजवळ येत होते, अशी माहिती अहवालामध्ये आहे.

सचिन वाझेंनी बॉम्ब निकामी करण्याकरिता आलेल्या पथकाच्या कामात वारंवार हस्तक्षेप केला होता. स्फोटकं आढळून आल्यावर पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना दूर उभे राहण्यास सांगितले होते. तो प्रोटोकॉलचा भाग होता. मात्र, वाझे सतत कारजवळ येत होते. यामुळे तुमच्यासह इतरांच्या जीवाला देखील धोका असल्याचे वाझेंना अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, तरी देखील वाझेंनी अनेकदा प्रोटोकॉल मोडला, असे एटीएसने अहवालात नमूद केले आहे.

२५ फेब्रुवारी २०२१ दिवशी अँटिलियापासून ४०० मीटर अंतरावर एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती. या कारमध्ये स्फोटकं असल्याचे तपासातून पुढे आले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात असल्याचे तपासातून पुढे आले आहे. यानंतर वाझेंना अटक झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT