MSRTC Employees salary : राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आजच होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. वेतनासाठी प्रशासनाने ३०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पण कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनच बँकेत जमा होणार आहे. ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. (Latest Marathi News)
दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३६० कोटी रुपये देण्याची गरज आहे. तशी हमी सरकारने न्यायालयात दिली. मात्र, दर महिन्याला सरकारकडून अपुरा निधी दिला जात आहे. त्यामुळे कामगारांची देणी देण्यासाठी थकलेली रक्कम ही १ हजार २०० कोटी रुपयांच्या घरात गेलेली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मी आणि गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एक व्यापक बैठक घेण्यात यावी, असा आग्रह मी धरणार आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न चुकता झाला पाहिजे. एसटीला गतवैभव प्राप्त होणार आहे. आम्ही कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत. नवीन सरकार आहे, त्यांना काही वेळ द्यायला हवा. येत्या काळात एसटीबाबत ठोस निर्णय होईल. एसटी कर्मचाऱ्यांची पेन्शन, ग्रॅज्युइटी आदी मुद्द्यांबाबत बैठक घ्यावी लागेल. तसा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, अशी माहितीही खोत यांनी यावेळी दिली.
या महिन्याची १० तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारची कामगारविरोधी भूमिका उघड झाली आहे. सरकार कर्मचाऱ्यांशी लबाडी करत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.