Shivneri buses now available from Hinjawadi to Kolhapur, Nashik, and Sambhajinagar — ideal for weekend travelers. Saam TV News
मुंबई/पुणे

Shivneri : हिंजवडीतून ३ नव्या शिवनेरी धावणार; कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगरला जायचं टेन्शन संपलं, तिकिट किती?

Hinjawadi to Nashik Kolhapur Shivneri Fare and Schedule : हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MSRTC ने हिंजवडी फेज-III येथून कोल्हापूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरसाठी शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे.

Namdeo Kumbhar

Shivneri buses now available from Hinjawadi to Kolhapur, Nashik, and Sambhajinagar : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील आयटी व्यावसायिकांसाठी विकेंडचा प्रवास आरामदायी आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारपासून (६ जून २०२५ ) हिंजवडी फेज-III (टीसीएस सर्कल) ते छत्रपती संभाजीनगर जोडणारी नवीन शिवनेरी बस सेवा सुरू करण्यात आली. त्याशिवाय नाशिक आणि कोल्हापूर या प्रमुख शहरासाठीही येथून शिवनेरी सुरू करण्यात आली आहे. "आम्हाला हिंजवडी येथे काम करणाऱ्या लोकांकडून आणि व्यावसायिकांकडून शिवनेरी बस सुरू करण्याबाबत सातत्याने विनंत्या मिळाल्या, त्यामुळेच या मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिवाजीनगर डेपोचे इन्चार्ज कानडे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडजवळील हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे झपाट्याने विकसित होत आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या आयटी पार्कात इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, टेक महिन्द्रा आणि सिंबॉयसिस, आय.आय.आय.टी. सारख्या कंपन्या, संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे या आयटी पार्कमध्ये हजारो लोक कामासाठी असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं कामाला येतात, ते सुट्टीला घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी जाण्याची सोय करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूयात सविस्तर माहिती..

हिंजवडीतून विकेंडला शिवनेरीची सेवा कशी असेल? Weekend Travel Schedule From Hinjawadi

Sambhajinagar-Hinjawadi Shivneri

प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता हिंजवडीमधून छत्रपती संभाजीनगरसाठी शिवनेरी बस निघेल. घरी जाणाऱ्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक सोमवारी सकाळी ४.३० वाजता संभाजीनगरहून हिंजवडीसाठी बस उसेल. ज्याला सोमवारी कामावर परत यायचेय, त्यांच्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

नाशिक कोल्हापूरसाठी कशी असेल सेवा ?

Hinjawadi-Kolhapur : कोल्हापूरसाठी हिंजवडीमधून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता शिवनेरी बस निघेल. तर कोल्हापूरहून सोमवारी पहाटे ४ वाजता हिंजवडीसाठी शिवनेरी सुटेल.

Hinjawadi-Nashik: शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हिंजवडीमधून सायंकाळी पाच वाजता बस निघेल. तर नाशिकमधून सोमवारी पहाटे साडेचार वाजता बस सुटेल.

तिकिटाची किंमत किती असणार ? Affordable Fare

पुरूषांसाठी - ₹968

महिलांसाठी : ₹511

ज्येष्ठ नागरिक (65-74 years): ₹511

ज्येष्ठ नागरिक (75 years and above): शून्य रूपये

बुकिंग कसं कराल ? How to Book

प्रवासी MSRTC च्या अधिकृत वेबसाइट (www.msrtconlinebooking.com) (www.msrtconlinebooking.com) किंवा Android आणि iOS वर उपलब्ध MSRTC मोबाइल अॅपद्वारे आपले तिकिट बुक करू शकतात. मार्ग-संबंधित प्रश्न किंवा मदतीसाठी प्रवासी थेट 79722 22949 वर संपर्क साधू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT