Students check Maharashtra SSC Result 2026 online after MSBSHSE officially declared the Class 10 board results. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

Maharashtra SSC Result 2026 Declared : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.

Namdeo Kumbhar

MSBSHSE 10th Class Result Maharashtra Board Announced SSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला. https://sscresult.mahahsscboard.in/ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे.

मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर केला आहे. बारावीप्रमाणेच दहावीचा राज्याचा निकाल घसरला आहे. गतवर्षीपेक्षा दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालाच्या टक्केवारीत मुलांपेक्षा सरस कामगिरी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक लागलाय.

पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result) राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये काय?

  • राज्याचा एकूण निकाल : ९२.०९ टक्के

  • मुलींचा निकाल : ९४.९६ टक्के

  • मुलांचा निकाल : ९०.५६ टक्के

  • सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण ९७.६२

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के लागला?

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण, मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे. Maharashtra SSC result 2026 pass percentage details

  • कोकण:९७.६२ टक्के

  • पुणे: ९४.२४ टक्के

  • नागपूर: ८९.०७ टक्के

  • मुंबई: ९४.९७ टक्के

  • कोल्हापूर: ९५.४७ टक्के

  • अमरावती: ९०.५० टक्के

  • नाशिक: ९०.५३ टक्के

  • लातूर: ८८.४२ टक्के

  • छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

  • एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६

  • उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

निकाल कुठे पाहायचा?

विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात:

दहावीचा निकाल कसा पाहाल? how to check Maharashtra board 10th result online

वरीलपैकी कुठल्या ही संकेतस्थळावर जा

तुमचा दहावीचा सीट नंबर टाका

तुमच्या आईचे नाव इंग्रजीत टाका

निकाल पाहण्यासाठी 'View Result' बटणावर क्लिक करा

निकालाचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट आउट काढू शकता

डिजीलॉकर मार्कशीट - DigiLocker marksheet download HSC

निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवर (DigiLocker) डिजिटल मार्कशीट पाहता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करावा लागणार आहे. डिजीलॉकर ॲप किंवा वेबसाइटवरून बारावीचे विद्यार्थ्यांना मार्कशीट डाऊनलोड करता येईल.

गुणपत्रिका कधी मिळणार?

आज दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. निकालाची मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळेत काही दिवसांनंतर दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांच्यासाठी बोर्डाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल.

निकालानंतर पुढे काय? Supplementary exam date Maharashtra board

जर तुम्हाला आपल्या गुणांची पडताळणी (Verification) करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवी असेल. तर बोर्डाकडून लवकरच ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल. याबाबत बोर्डाकडून सोमवारी तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापूरात मध्यरात्री रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Pune Crime: कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, मुंढवा पुलावरुन मारली उडी; पुण्यात खळबळ

Pandharpur : आणखी एका भोंदूला बेड्या, पैशांचा पाऊस पाडतो म्हणत लाखो लुबाडले, माढ्यातील धक्कादायक प्रकार

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर नवे जाहीर, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bollywood Actress: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; डिलेव्हरी बॉयने शिवीगाळही केली, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT