Maharashtra SSC, HSC 2026 Result  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

HSC Result 2026 Today : बारावीचा निकाल आज! संकेतस्थळाची अधिकृत यादी एका क्लिकवर, वाचा सविस्तर

Maharashtra Board HSC Result 2026 Today MSBSHSE : महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज जाहीर होणार असून दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. निकाल कसा पाहायचा, अधिकृत लिंक आणि डिजीलॉकर मार्कशीटची संपूर्ण माहिती...

Namdeo Kumbhar

Maharashtra Board 12 class HSC Exam Result 2026 Website List : बारावीच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची आज प्रतिक्षा संपणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सकाळी ११ वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. hscresult.mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना-पालकांना दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे. त्याशिवाय डिजिलॉकरवरही निकालाच्या अपडेट मिळतील.

आज सकाळी ११ वाजता पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोणता विभागातील किती विद्यार्थी पास झाले, राज्याचा निकाल किती लागला? याबाबतची माहिती यामध्ये दिली जाणार आहे. आज (शनिवार, २ मे २०२६) दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागात बारावाची परीक्षा पार पडली. राज्यभरातून १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. सलग दोन वर्षपासून कोकण विभागीय मंडळाचा निकालात बाजी मारत आहे. आठ विभागीय मंडळ कुठले मंडळ या वर्षी बाजी मारणार याकडे लक्ष लागलेय.

कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहाल...

https://hscresult.mahahsscboard.in/

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

बारावीचा निकाल कसा पाहाल?

वरील पैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा

'HSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा

तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर टाका

तुमच्या आईचे पहिले नाव टाका

'View Result' वर क्लिक करा

तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआऊट तुम्ही घेऊ शकता

डिजीलॉकर मार्कशीट -

निकाल लागल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवर (DigiLocker) डिजिटल मार्कशीट पाहता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करावा लागणार आहे. डिजीलॉकर ॲप किंवा वेबसाइटवरून बारावीचे विद्यार्थ्यांना मार्कशीट डाऊनलोड करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्याला अवकाळी पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; पुढील काही दिवस महत्त्वाचे

Ahilyanagar Tourism : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

Cancer Risk Unmarried: लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

Monalisa : "मला १० वेळा स्पर्श केला"; 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: नाशिक शहरातील काही भागात आज पाणीबाणी

SCROLL FOR NEXT