mpsc student darshana pawar death case Rahul handore Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar Case: MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं; वाचा संपूर्ण घटनाक्रम

Darshana Pawar Murder Case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. MPSC टॉपर दर्शना पवार हिची हत्या तिचाच मित्र राहुल हंडोरे याने केल्याचं समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Darshana Pawar Murder Case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. MPSC टॉपर दर्शना पवार हिची हत्या तिचाच मित्र राहुल हंडोरे याने केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी राहुलला मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. आपणच दर्शनाची हत्या केली, अशी कबुली सुद्धा त्याने पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार (वय २६ वर्ष राहणार कोपरगाव, जि. अहमदनगर) हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या पायथ्याशी १८ जून रोजी आढळून आला होता. दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात सहावी आली होती. मात्र, तिचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली.

दर्शना ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील असून, राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र असून, लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. दोघे लग्न करणार होते. राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. राहुल याने परीक्षेपूर्वी तिच्याशी ब्रेकअप केले होते.

दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदावर निवड झाली. त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्याने सांगितले. परंतु दर्शनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. तिथेच राहुल याने तिची हत्या केली.

दर्शना पवार हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

९ जून - खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कारासाठी दर्शना पवार पुण्यात दाखल

१० जून - ओळखीच्या तरुणासमवेत किल्ले राजगड फिरण्यासाठी गेल्याची माहिती

१० जून - सायंकाळी चार वाजेपर्यंत दर्शना घरातील व्यक्तींच्या संपर्कात

११ जून ते १४ जून - वडील आणि नातेवाइकांकडून दर्शनाचा शोध

१५ जून - सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार

१८ जून- किल्ले राजगडच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह आढळला

२१ जून- संशयित आरोपी राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT