MPSC Candidate Agitation In Pune ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

Pune: स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही MPSCला जाग नाहीच; ३.५ वर्षांनंतरही नियुक्ती नसल्यानं उमेदवारांंचं भीक मांगो आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: एमपीएससीच्या (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अनेक वर्षे नियुक्ती न मिळाल्याने उत्तीर्ण उमेदवार आक्रमक झाले आहेत. या आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन (Agitation) केले आहे. जवळपास ३.५ वर्षांचा कालावधी उलटला असूनही नियुक्ती न मिळाल्याने या उमेदवारांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याचे आई-वडिलही सहभागी होणार आहेत. (Pune Latest News)

हे देखील पाहा -

एमपीएससीच्या (MPSC) गलथान कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तीन वर्ष रखडलेली परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एप्रिल महिन्यात परीक्षेचा निकाल लागून ११४३ अभियंत्यांच्या निवड देखील करण्यात आली. मात्र त्यानंतर चार महिने उलटून गेल्यावर देखील निवड झालेल्या या उमेदवारांना वरुन आदेश येत नसल्याने अद्याप नियुक्त करुन घेण्यात आलेलं नाही. या सर्व प्रक्रियेला ३.५ वर्षे उलटली, मात्र एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.

राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम या तीन खात्यांमध्ये क्लास १ आणि क्लास २ च्या अभियंत्यांच्या ११४३ जागा आहेत

- मार्च २०१९ ला जाहिरात प्रसिद्ध झाली.

- जून २०१९ ला पूर्व परीक्षा झाली.

- तर २४ नोव्हेंबर २०१९मला मुख्य परीक्षा झाली.

- मात्र त्यानंतर दीड वर्ष काहीच हालचाल झाली नाही.

- त्यामुळे २९ जून २०२१ ला हीच परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली, त्यानंतर ऑक्टोबरला मुलाखती सुरु झाल्या.

- फेब्रुवारी २०११ मध्ये गुणवत्ता यादी जाहीर झाली, ज्यामध्ये आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचे नाव होते. म्हणजे परीक्षा उत्तीर्ण झालेला स्वप्नील सरकारी अनास्थेचा बळी ठरला होता.

- एप्रिल २०२२ मध्ये ११४३ जणांची निवड जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर काहीच झालेलं नाही.

याप्रकरणात आता ११४३ उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन केलं आहे. नियुक्ती मिळाली नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकरचे पालकही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाच्या दिरंगाई भूमिकेमुळे उत्तीर्ण उमेदवार नैराश्‍यात जात आहेत. ही नियुक्‍ती लवकर मिळण्यासाठी एमपीएससी उमेदवारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून गोविंदांना खेळाडू आरक्षणातून सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली असताना, दुसरीकडे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ या परीक्षेतून निवड झालेल्या ११४३ उमेदवारांना साडेतीन वर्षांनंतरही नियुक्ती मिळालेली नाही.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT