MPSC Latest Marathi News, MPSC Exam Latest News in Marathi,
MPSC Latest Marathi News, MPSC Exam Latest News in Marathi,  SaamTv
मुंबई/पुणे

खुषखबर! UPSC च्या धर्तीवर MPSC ने घेतला मोठा निर्णय!

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (सी- सॅट) हा अर्हताकारी होण्यासाठी किमान ३३ टक्के गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. (MPSC Exam Latest Marathi News)

दरम्यान राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी अनेक दिवसांपासून या निर्णयाची मागणी करत होते. UPSC च्या धर्तीवर MPSC ने असा निर्णय घ्यावा अशी अनेकांची मागणी होती. कारण काही विद्यार्थांना CSAT चा पेपर अवघड जात होता. C-SAT पेपर हा फक्त अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्यांना सोपा जात होता. या निर्णयासाठी अनेक आंदोलन झाले होते. आता विद्यार्थांच्या लढ्याला यश आले आहे. राज्यसेवेच्या मुख्य परिक्षेत मात्र कुठला बदल करण्यात आलेला नाही.

अशी असते मुख्य परीक्षा

राज्यसेवेच्या मुख्य परिक्षेत प्रामुख्याने चार पेपर असतात. पेपर.१,२,३,४ हे चारही पेपेर प्रत्येकी १५० मार्क असतात. त्याचबरोबर भाषा ज्ञानाचे मराठी आणि इंग्रजीचे पेपर असतात. याचा संपुर्ण अभ्यासक्रम आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध आहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत होते आणि नंतर त्यांच्या मार्कांवरुन किंवा योग्यवरुन पोस्टींग दिले जाते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT