MPSC exam schedule SaamTv
मुंबई/पुणे

MPSC Exam 2024: तयारीला लागा! एमपीएससीकडून पूर्व परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC Exam 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंदाजे २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे

Vishal Gangurde

MPSC Exam 2024:

राज्यातील पदवी उत्तीर्ण सुशिक्षित तरुणांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंदाजे २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या परीक्षांची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर या राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित केल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयोगाकडून दरवर्षी अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात येतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी आयोगाकडून अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात येतं.

आयोगाकडून २०२४ मध्ये १६ परीक्षांचे नियोजन करण्यात आलं आहे. या परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब , गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर नियोजित महिन्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वेळापत्रकात काही बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? यादी आली समोर

SCROLL FOR NEXT