MPSC Exams x
मुंबई/पुणे

मोठी बातमी! २१ डिसेंबरची MPSC परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख काय?

MPSC Exam Postponed : २१ डिसेंबर रोजी होणारी MPSC गट-ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीमुळे पुढे ढकलली आहे.

Namdeo Kumbhar

MPSC Exam Postponed Due to Municipal Election Results : २१ डिसेंबर रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषदेचे निकाल लागत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ४ जानेवारी रोजी होणार होणार आहे. याबाबत अधिकृत परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा रविवार २१ डिसेंबरला होणार होती. त्याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्‍यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आयोगाकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतु पावसामुळे २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही परीक्षा ४ जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर कऱण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी  सहायक कक्ष अधिकारी- ०३ पदे, राज्य कर निरीक्षक-२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक - ३९२ पदे यासाठी पूर्व परीक्षा होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमकं काय म्हटलेय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५ कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ०२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती. आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT