MP Supriya Sule
MP Supriya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

खासदार सुप्रिया सुळे ठरल्या संसद विशिष्टरत्न; चेन्नई येथील संस्थेकडून संसद महारत्न पुरस्कार प्रदान

साम टिव्ही ब्युरो

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना सर्वोत्कृष्ट संसदिय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार फौंडेशनचे के. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सन्मान आहे, अशा शब्दात खा. सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

फेब्रुवारी महिन्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेतील खासदार सुळे (Supriya Sule) यांची उपस्थिती, चर्चेतील सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके यासाठी सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला असून यंदा त्यांना संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

गत सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फौंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१८७ चर्चासत्रात भाग घेतला

सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी चालू अधिवेधनात आता पर्यंत म्हणजे २९ जुलै २०२२ पर्यंत ९३ टक्के उपस्थिती लावत १८७ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण ४५६ प्रश्न त्यांनी विचारले असून १० खासगी विधेयके मांडली आहेत.

'बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा मला लोकसभेत पाठविले. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील व महाराष्ट्रातील प्रत्येकाचा आहे. या सर्वांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

'यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. याबद्दल पक्षाचे तसेच माझ्या संसदीय कामकाजात माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, संसदेतील स्टाफ आदी सर्वांचे मनापासून आभार. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम करीत आहे, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षापासून हिंडतोय; शरद पवारांचं पीएम मोदींना जशास तसं उत्तर

Devendra Fadanvis : त्यांना पक्ष चालविणे कठीण असल्याने विलीनीकरणाचा निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला

Amravati: कोंडेश्वर वीटभट्टीवर महसूलची धडक कारवाई, अतिक्रमित झाेपड्याही जमीनदाेस्त; काेट्यावधींच्या नुकसानीचा वीटभट्टी मालकांचा दावा

Election Commission: मोठी बातमी! पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Today's Marathi News Live : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर

SCROLL FOR NEXT