Sanjay Raut Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: 'सरकारने राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बळी गेले', संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Maharashta Government: . 'हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती.', असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

Priya More

Mumbai News: नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला (Maharashtra Bhushan Award ceremony) उपस्थिती लावलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्या अनुयायांना उष्माघात झाला. या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या 12 श्री भक्तांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेक श्री भक्तांवर नवी मुंबईच्या एनजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शोक व्यक्त करत सरकारवर (Maharashtra Government) जोरादर टीका केली आहे. सरकारने राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच बळी गेले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर आरोप केला की, 'या कार्यक्रमात लाखो भक्तांची सोय किंवा व्यवस्था न पाहता गृहमंत्री अमित शहा यांची वेळ पाहिली गेली. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती. पण गृहमंत्री अमित शाह यांना संध्याकाळी वेळ नव्हती त्यामुळे कडक उन्हात हा कार्यक्रम झाला. सर्व व्हीआयपी छपराखाली होते अप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक तळपत्या उन्हात बसले होते.'

'आम्हाला या सोहळ्यावर टीका करायची नाही कारण आम्ही आप्पासाहेबांना मानतो, त्याचे कार्य मानतो. त्या सेवत सहभागी होणाऱ्या भक्तांना ज्या यातना झाल्या त्यांचा मृत्यू झाला हे अतिशय दु:खद आहे. अशाप्रकारच्या घटना देशात वारंवार घडल्या आहेत त्यामुळे हा कार्यक्रम करण्यापूर्वी सरकारने याचा बोध घ्यायला हवा होता. सहा तास उन्हात बसलेल्यांची सोय न पाहता आप्पासाहेब वगळता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता त्यांच्या कुरघोड्या सुरु होत्या.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तसंच, 'तो संपूर्ण समुदाय आप्पासाहेबांचा होता राजकीय नाही. अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी तो समुदाय आला नव्हता. तो आप्पासाहेबांसाठी आला होता. राजकारण्यांनी त्यांचा अंत पाहिला तो ऐवढ्या टोकाला गेला की त्यातील लोकं उप्माघाताने कोसळले आणि त्यांचा बळी गेला. आप्पासाहेबांच्या मानवतेविषयक सेवेवर आम्हाला कायम अभिमान आहे. यावर मी आता काही बोलणार नाही कारण जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे.' असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

तसंच, 'लाखो भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकीय व्यवस्था पाहण्यात आली त्यातूनच ही दुर्घटना घडली.' असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यासोबत 'सरकारी कार्यक्रम आहे. सरकारने या तळपत्या उन्हात लोकांना बोलवलं. सरकारकडे तज्ज्ञ असतात अनुभवी लोकं असतात. त्यांना समजायला हवं होता हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे आणि कधी संपला पाहिजे. सरकारने राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बळी गेला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT