Mumbai-Nashik highway traffic jam Saam TV News
मुंबई/पुणे

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, खासदार बाळ्या मामा उतरले रस्त्यावर

Mumbai-Nashik highway traffic jam : मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भिवंडीचे खासदार बाळ्या मामा पुन्हा रस्त्यावर उतरले. त्यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरत वाहतूक सुरळीत केली.

Namdeo Kumbhar

फयाज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai-Nashik highway traffic jam : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरही आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्या मामा रस्त्यावर उतरले. बाळ्या मामाने टोल प्रशासनाला धारेवर धरत वाहतूक सुरळीत केली. बाळ्या मामाचा वाहतूक सुरळीत करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लगत आहे. या महामार्गावरील पडघा येथील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सुद्धा बसला. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे रविवारी रात्री उशिरा शहापूर येथील कार्यक्रम आटपून भिवंडी येथील आपल्या घरी परतत होते. त्यांना सुद्धा टोल नाक्यावरील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.

टोल वसुलीसाठी टोल नाक्यावर वाहन थांबवून ठेवल्याने टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने झालेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा रविवारी रात्री पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. खासदार बाळ्या मामा यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली. खासदार बाळ्या मामा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून खासदारांच्या या कामाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. याआधी देखील भिवंडीतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्या मामा रस्त्यावर उतरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT