Mumbai-Goa Express Way Traffic Jam: मुंबई-गोवा महामार्गावर 1 तासापासून मोठी वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल

Unseasonal Rains : सर्वसामान्य नागरिकांना आणि चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
Mumbai-Goa Express Way Traffic Jam
Mumbai-Goa Express Way Traffic JamSaam TV
Published On

Ratnagiri: अवकाळी पावसाने सर्वच नागरिक त्रस्त झालेत. खेड्यापाड्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशात या पावसामुळे आता घाटातील वाहतूक देखील धोक्याची ठरत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.(Latest Marathi News)

अशात मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Express Way) गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच परशुराम घाटाचा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. परशुराम घाटातील पर्यायी मार्ग म्हणून चाकरमान्यांनी चिरणी आंबडस मार्गावर आपली वाहने वळवली आहेत. त्यामुळे चिरणी आंबडस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

गेल्या १ तासापासून वाहतूक कोंडी

पावसामुळे घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे सर्व पर्यायी मार्गांवर गर्दी उफाळली आहे. चिरणी आंबडस महामार्गावर आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे गेल्या एक तासापासून नागरिक आपली वाहने घेऊन रस्त्यावर उभे आहेत. वाहतूक कोंडीने नागरिकांची मोठी गैरसोय होतेय.

कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, शाहुवाडी, राधानगरी तसेच कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस पडलेला आहे.

दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाला सुरूवात.

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवस पावसाने विश्रांती दिली होती.परंतु आज पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. मागील जवळपास 12 दिवस सतत पाऊस पडला. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.आता पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. वातावरणातील बदलानंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com