Badlapur Latest News. File photos Saam tv
मुंबई/पुणे

Tanker Ban in Thane: डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात २ महिने टँकर बंदी; कारण काय? वाचा सविस्तर

Badlapur Latest News: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ,बदलापुरात टँकर वाहतुकीला बंद घालण्यात आली आहे.

Vishal Gangurde

Thane tanker ban Latest news:

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ,बदलापुरात टँकर वाहतुकीला बंद घालण्यात आली आहे. टँकर वाहतूक बंदी ही १० नोव्हेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२३ पर्यंत राहणार आहे. या भागात येत्या १० नोव्हेंबरपासून सायंकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी राहणार आहे. (Latest Marathi News)

टँकर वाहतुकीला बंदी घालण्यासाठी राज्य सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागात औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी सहा वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

10 नोव्हेंबरपासून सायंकाळी सहा वाजेपासून ते सकाळी ६ वाजेदरम्यान टँकरमधून धोकादायक केमिकल वाहून नेऊन ते रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात सोडले जातात. त्यामुळे नदीचे पाणी प्रदुषित होते.

या प्रदुषित नदीच्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे टँकरवर बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सांयकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारचे टँकर वाहतूकीला बंदी घालण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Safety Tips : हेल्मेटचीही असते 'एक्सपायरी डेट', बाइक-स्कूटर चालवणाऱ्यांनी वेळेवर बदलले पाहिजे हेल्मेट

भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत माजी आमदाराचा राजीनामा; गडकरींचे निकटवर्तीय म्हणून ओळख

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक दाखल

Buttermilk Benefits Stomach Worms: पोटात जंत झाले असतील तर ताकाचा सोपा उपाय करून पाहा; मिळेल त्वरित आराम

Makeup Remover: गरबा खेळून आल्यावर 'या' सोप्या पद्धतीने करा मेकअप रिमूव्ह; कधीच होणार नाही पिंपल्स आणि डागांचा त्रास

SCROLL FOR NEXT