बाप-लेकीने सर केले युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस !  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

बाप-लेकीने सर केले युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस !

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या बाप लेकीने युरोप खंडातील सर्वात उंच माउंट एलब्रुज शिखर सर केले आहे. हे युरोप खंडातील सर्वात उंच शिखर असून या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या बाप लेकीने युरोप खंडातील सर्वात उंच माउंट एलब्रुज शिखर सर केले आहे. हे युरोप खंडातील सर्वात उंच शिखर असून या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी असून वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गिरीजा लांडगेने तिचे वडील धनाजी लांडगे यांच्यासोबत माउंट एल्ब्रुसवर यशस्वीपणे चढाई केली आहे. विशेष म्हणजे गिरीजाने वयाच्या १२ व्या वर्षी माउंट एल्ब्रुस शिखर सर केले आहे. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिलीच मुलगी असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पहा -

माउंट एल्ब्रुस हे शिखर सर करायला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक असून गिरीजाने आणि तिचे वडील धनाजी यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. युरोपातील आणि भारतातील हवामान यात मोठ्या प्रमाणात फरक असून त्याच्याशी जुळवून घेत या बाप लेकीच्या जोडीने हा पराक्रम केला आहे. माउंट एल्ब्रुस शिखरावर चढाई करण्यासाठी योग्य प्रशिक्षण व मेहनत आवश्यक असते.

माउंट एल्ब्रुसवरील तापमान उणे २५ ते ४० डिग्रीपर्यंत असते त्यामुळे येथे प्रचंड थंडी आणि वेगाने वाहणारे वारे व प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागतो. माउंट एल्ब्रुसवरील वातावरणात सतत बदल होत असल्याने शारीरिक आणि मानसिक तयारी तसेच योग्य प्रशिक्षण घेऊनच या मोहिमेची निवड करावी लागते. प्रंचड थंडी आणि वाऱ्याचा सामना करत गिरीजा आणि धनाजी यांनी माउंट एल्ब्रुस सर केला आहे. माउंट एल्ब्रुसवर भारतीय झेंडा फडकावून गिरीजा आणि धनाजी यांनी लेक वाचवा-लेक जगवा असा संदेश दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

SCROLL FOR NEXT