अमरावतीत हवाल्याचे अडीच कोटी रुपये जप्त; सहा जणांना अटक

अमरावती शहर पोलिसांच्या राजापेठ पोलिसांनी पहाटेच्या सुमारास दोन संशयास्पद वाहनांवर कारवाई करून तब्बल २ कोटी ५० लक्ष रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
अमरावतीत हवाल्याचे अडीच कोटी रुपये जप्त; सहा जणांना अटक
अमरावतीत हवाल्याचे अडीच कोटी रुपये जप्त; सहा जणांना अटकअरुण जोशी
Published On

अमरावती - अमरावती शहर पोलिसांच्या राजापेठ पोलिसांनी पहाटेच्या सुमारास दोन संशयास्पद वाहनांवर कारवाई करून तब्बल २ कोटी ५० लक्ष रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. शहरातील फरशी स्टॉप परिसरात हि कारवाई करण्यात आली असून यामध्ये एकूण ६ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यापैकी दोघे जण हे अमरावती शहरातील स्थानिक नागरिक असून इतर चौघे हे गुजरात येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे देखील पहा -

शहरातील फरशी स्टॉप परिसरातील विणा अपार्टमेंट मधून काही इसम हवाल्याचे पैसे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी दोन स्कॉर्पिओ वाहनांना चौकशीसाठी थांबविले. वाहनामध्ये शिवदत्त महेंद्र गोहिल, वाघेला सिरूजी गोलंदाजी, रामदेव बबादूरसिंह राठोर आणि नरेंद्र दिलीपसिंह गोहिल हे चौघे आढळून आले.

संशय आल्याने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी दोन्ही वाहने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणून तपासणी केली असता महिंद्रा स्कॉर्पिओ एमएच १८/बीआर १४३४ मधून ३ कोटी ५० लक्ष ९ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओ मध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आली होती.

अमरावतीत हवाल्याचे अडीच कोटी रुपये जप्त; सहा जणांना अटक
पूरग्रस्तांसाठी पुणे मनपाचा मदतीचा हात !

गाडीतील रक्कम सहजासहजी कुणालाही दिसू नये यासाठी गाडीच्या मध्य भागातील सीट खाली एक विशिष्ट प्रकारचा बॉक्स तयार करून त्यात हि रक्कम लपवली होती. त्यानंतर तपासादरम्यान दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विणा अपार्टमेंट मधून निलेश भरतभाई पटेल व जिग्नेश राजेश गिरीगोसावी या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या प्रकरणी आता पर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांचे कडून नगदी आणि दोन वाहने असा ३ कोटी ७२ लाख ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या रकमेचा कुठलाही अधिकृत तपशील अद्याप पर्यंत पोलिसांना मिळाला नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले. आयकर विभागाच्या तपासणी नंतर काही गैर प्रकार असल्याचं आढळून आल्यास त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com