Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: दीड वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; निर्दयी पत्नी-पत्नीला अटक, मुंबईतील संतापजनक घटना

Jogeshwari Crime News: आपल्याच मुलाची हत्या करुन त्याच्या अपहरणाचा बनाव रचणाऱ्या महिलेस तिच्या प्रियकराला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेमात अडसर ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच प्रियकरासोबत मिळून आपल्याच दीड वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली. ही संताजपनक घटना मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari )परिसरात घडली. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी निर्दयी आईसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

विशेष बाब म्हणजे निर्दयी आई आणि आरोपीने चिमुकल्याच्या अपहरणाचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रिंकी दास आणि तिचा प्रियकर राजेश राणा अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात आरोपी महिला रिंकी आणि तिचा प्रियकर राजेश हे चिमुकल्यासह वास्तव्यास होते. मुळात मृत मुलगा हा रिंकीच्या पहिल्या पतीपासून झाला होता. राजेश हा रिंकीचा दुसरा नवरा होता.

राजेश आणि रिंकीमध्ये दीड वर्षाच्या चिमुकल्यावर सतत भांडणे होत होती. त्यामुळे दोघांचाही चिमुकल्यावर राग होता. आपल्या प्रेमप्रकरणात तो अडसर ठरतोय, असं आरोपींना वाटत होतं. त्यामुळे दोघांनी मिळून चिमुकल्याला अमानूष मारहाण (beating)केली.

या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी चिमुरड्याचा मृतदेह फेकला नाल्यात फेकला. त्यानंतर २१ मे रोजी आरोपींनी मेघवाडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

त्यात राजेशने गुंगीचे औषध देऊन मुलाचं अपहरण झाल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक मुलाच्या शोधकार्यास लागले. पोलिसांनी अनेक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरुन पोलिसांना राजेश आणि रिंकी आपली दिशाभूल करत असल्याचा संशय आला.

पोलिसांनी रिंकी आणि राजेशला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट तसेच अपहरणाचा खोटा बनाव रचल्याप्रकरणी राजेश आणि रिंकीला अटक करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

Gold Price Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, १० तोळा सोनं ८८०० रुपयांनी स्वस्त; २४ - २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Mumbai Local News : खोपोली लोकल १५ डब्यांची होणार, गर्दीला ब्रेक लागणार, वाचा रेल्वेचा प्लॅन

आणखी एक विमान अपघात! लँड करताच दुसऱ्या विमानाला धडकलं; स्फोटामुळे हवेत आगीचा लोट, थरारक VIDEO व्हायरल

Gautami Patil Photos: रुपाची राणी! गौतमी पाटील झाली राधा, आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT