Mosquito Coils Saam Tv
मुंबई/पुणे

Mosquito Agarbatti: डास घालवण्यासाठी अगरबत्ती वापरताय? थांबा, ठरु शकते कुटुंबासाठी विषारी; वाचा रिपोर्ट

Mosquito Agarbatti Harmful: जर तुम्ही घरातील डास घालवण्यासाठी अगरबत्ती लावत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. डास घालवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अगरबत्तीमध्ये अनेक रसायनांचा वापर केला आहे.

Suprim Maskar

सागर आव्हाड, साम टिव्ही न्यूज, पुणे

डासांची अगरबत्ती तुमच्यासाठी आता जीवघेणी ठरणार आहे. कारण सर्वसामन्यांची झोड उडवणारा एक अहवाल समोर आलाय. हा अहवाल नेमका कुणी दिलीय? कृषी विभागानं डासांची अगरबत्ती करणाऱ्या उत्पादकांविरोधात कशी मोहिम सुरु केलीय.?

तुमच्या घरात डास पळवण्यासाठी तुम्ही डास प्रतिबंधक अगरबत्त्या वापरता का? तर वेळीच सावध व्हा. कारण ज्या अगरबत्तीच्या धूरात तुम्हाला शांत झोप लागतेय. तोच धूर तुमच्या कुटुंबासाठी विषप्रयोग ठरू शकतो.

कम्फर्ट आणि स्लीप वेलसारख्या डास प्रतिबंधक अगरबत्त्यांच्या कंपन्यांवर कारवाई करण्याआधी नेमकं काय घडलं?

कम्फर्ट अगरबत्तीत मेपरफ्लुथ्रिन हे किटकनाशक वापरलं जात असल्याची तक्रार प्रधान सचिवांकडे आली... त्यानंतर ठाणे विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना धूप छाप कंपनीत 29 अगरबत्ती बॉक्स आढळून आले... त्यातील 3 बॉक्स तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले... त्या तपासणीनंतर NIPHM हैदराबादकडून मिळालेल्या रिपोर्टमध्ये कम्फर्ट अगरबत्तीत डायमेफ्लुथ्रिन हे कीटकनाशक आढळलयं...या रसायनांना अगरबत्तीमध्ये वापरण्यासाठी कोणतीही अधिकृत मान्यता नाही. त्यामुळे याप्रकरणाचा खुलासा करण्याचा आणि कंपनीचे कम्फर्ट आणि स्लीप वेल या उत्पादनाची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत...तसचं यामध्ये कीटकनाशक कायदा,1968 आणि कीटकनाशक नियम, 1971 अंतर्गत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

दरम्यान या अहवालानंतर महाराष्ट्र कृषी संचालकांनी अगरबत्त्यांचा अवैध साठा जप्त करण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्याचे आणि दोषी उत्पादक, वितरकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिलेत...विशेष म्हणजे विभागीय अधिकारी सर्व कारवाईचे अहवाल थेट पुणे कृषी आयुक्तालयाकडे सादर करणार आहेत...त्यामुळे कृषी विभाग आता चांगलाच अॅक्शन मोडवर आलाय. तर अगरबत्त्यांमधील किटकनाशकाच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर काय घातक परिणाम होऊ शकत. आता या कारवाईमुळे बेकायदेशीर आणि किटकनाशकांचा वापर करून अगरबत्ती उत्पादन करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत..

तुम्ही जर अशा डास प्रतिबंधक अगरबत्ती वापरत असाल तर त्या अगरबत्त्यांवर CIBRC नोंदणी क्रमांक आहे का? याची खात्री करा.. अन्यथा डास पळवण्याच्या नादात तुमच्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात येईल.. हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT