Pune Fergusson College Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fergusson College: धक्कादायक, फर्ग्युसन परिसरात महिन्याभरात 800 पेक्षा अधिक दारुच्या बाटल्या सापडल्या

बाटल्यांसह प्लास्टिक कचरा (Plastic Waste) देखील 250 किलो जमा करण्यात आला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय हे शैक्षणिक वारश्यामुळे ओळखले जाते. गेल्या दोन एक वर्षांपासून काही दिवस सोडले तर कोव्हिडच्या कारणामुळे महाविद्यालये बंदच आहे. मात्र तरीही फर्ग्युसन मैदान ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात तब्बल आठशेहुन अधिक दारुच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीये. ही माहिती पुणे प्लॉग्गेर्स संस्थेने दिली आहे (More than 800 bottles of liquor were found in the Fergusson college area in one month).

2021 डिसेंबर महिन्यामध्ये 500 बाटल्या आणि जानेवारी 2022 मध्ये तब्बल 350 बाटल्या सापडल्या आहे. या सर्व बाटल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergusson College) आवारातील आहेत. बाटल्यांसह प्लास्टिक कचरा (Plastic Waste) देखील 250 किलो जमा करण्यात आला आहे.

ग्राउंड ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात या बाटल्या (Liquor Bottle) सापडल्या आहेत. पुणे प्लॉग्गेर्स नावाची संस्था 2019 पासून शहरातील कचरा साफ करण्याची मोहीम दर शनिवार आणि रविवारी राबवत आहेत.

पुण्यातील (Pune) नदीकाठी, प्रमुख रस्ते, गर्दीचे ठिकाण, महाविद्यालय अशा सर्व ठिकाणचे साफ सफाईचे काम करीत आहेत. या संस्थेमध्ये साठहून अधिक तरुण, लहान मुले आणि वयोवृद्ध आहेत. हा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT