India Famous CM Saam tv
मुंबई/पुणे

India Famous CM : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी आली समोर, एकनाथ शिंदे कोणत्या क्रमाकांवर?

Mood Of the Nation Survey News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया टु़डे'ने मूड ऑफ नेशन'च्या माध्यमातून एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या माध्यामातून जनतेची मते जाणून घेतली आहेत. या माध्यमातून देशातील १० लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याबाबत सर्व्हे केला गेला आहे.

Vishal Gangurde

Mood Of the Nation :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया टु़डे'ने मूड ऑफ नेशन'च्या माध्यमातून एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या माध्यामातून जनतेची मते जाणून घेतली आहेत. या माध्यमातून देशातील १० लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याबाबत सर्व्हे केला गेला आहे. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

'मूड ऑफ नेशन'च्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं स्थान यादीत पहिल्या स्थानी आहे. या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना ४६.३ लोकांनी पसंती दर्शवली आहे. याआधी देखील ऑगस्टमध्ये एक सर्व्हे घेण्यात आला होता. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना ४३ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पंसती दर्शवली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. अरविंद केजरीवाल यांना १९.६ लोकांनी पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ८.४ लोकांची पसंती मिळाली आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना ५.५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. नवीन पटनायक यांना २.५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

या सर्व्हेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या २. ३ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा यांना २ लोकांची पसंती मिळाली आहे. तर या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांना १.९ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना ०.५ टक्के मते मिळाली आहेत. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांना ०.४ टक्के लोकांनी पंसती दर्शवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT